वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर, गोऱ्हा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:31 AM2021-09-18T04:31:02+5:302021-09-18T04:31:02+5:30

आवळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर गंगाराम जयराम तिवाडे आपल्या म्हशी व बैल चारत असताना, मुख्य रोडला लागूनच झुडपात दबा धरून ...

Cattle serious, tiger killed in tiger attack | वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर, गोऱ्हा ठार

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर, गोऱ्हा ठार

googlenewsNext

आवळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर गंगाराम जयराम तिवाडे आपल्या म्हशी व बैल चारत असताना, मुख्य रोडला लागूनच झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गुरांना सोडून त्यांच्यावर हल्ला केला. वाघ ओढत नेत असताना, गंगारामने आरडाओरडा केला. रोडच्या दुसऱ्या बाजूला गुरे चारीत असलेला त्याचा सोबती गुराखी व कोशाचे रान करणारे रानकरी धावत गेले. त्यांना पाहून वाघाने गंगारामला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. लगेच रक्तबंबाळ अवस्थेत त्याला आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. गंगारामच्या डोक्याला आणि पाठीवर वाघाची नखे खोलवर रुतलेली आहेत. पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे.

गंगारामला गंभीर जखमी केल्यानंतर, काही वेळातच लटारू खेवले यांच्या गोऱ्ह्यावर त्याच पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

Web Title: Cattle serious, tiger killed in tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.