पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:58+5:30

तालुक्यात खासगी व सरकारी एकूण १०९ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या २१ प्राथमिक शाळा व नगर परिषद व खासगी मिळून २१ अश्या एकूण तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा आहेत. उच्च प्राथमिक सात शाळा व एक हायस्कूल आहे. उर्वरित हायस्कूल कॉन्व्हेंट खासगी आहेत. तर बल्लारपूर शहरात नगर पालिकेद्वारा १४ प्राथमिक शाळा, मोहसिनभाई जव्हेरी दोन व इतर अशा सात शाळा आहेत. या शाळेमध्येसुद्धा घंटी वाजलीच नाही.

Books reached the students on the first day | पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके

Next
ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यातील १०९ शाळांची घंटा वाजलीच नाही, केवळ शिक्षक गेले शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : दरवर्षी शाळेचा पहिला दिवस म्हणजे फुल देऊन मुलांचे स्वागत करण्याचा असतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तालुक्यातील १०९ शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात आली.
तालुक्यात खासगी व सरकारी एकूण १०९ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या २१ प्राथमिक शाळा व नगर परिषद व खासगी मिळून २१ अश्या एकूण तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा आहेत. उच्च प्राथमिक सात शाळा व एक हायस्कूल आहे. उर्वरित हायस्कूल कॉन्व्हेंट खासगी आहेत. तर बल्लारपूर शहरात नगर पालिकेद्वारा १४ प्राथमिक शाळा, मोहसिनभाई जव्हेरी दोन व इतर अशा सात शाळा आहेत. या शाळेमध्येसुद्धा घंटी वाजलीच नाही.
शाळा सुरु होण्यापूर्वी नगर परिषदेमध्ये सर्व शाळेच्या शिक्षकांची सभा उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे यांच्या उपस्थितीत झाली. यात शासनातर्फे आलेले निर्णय सांगण्यात आले. त्यानुसार परिस्थिती पाहून सप्टेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू केली जाईल. परंतु पहिला व दुसरा वर्ग जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, तालुक्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवणे सुरू
जिल्हा परिषद शाळा पळसगाव येथील शिक्षक सुनील कोवे म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांचे पुस्तके आली आहेत. मुलांच्या घरोघरी जाऊन वाटणे सुरु आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविले जात आहे. जव्हेरी शाळेच्या उपमुख्याध्यपिका आशा ढेंगळे म्हणाल्या, पहिला दिवस शाळेतील मुलाविना गेला. गुरुनानक पब्लिक स्कूलचे कैलास खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन शिकायला मिळावे यासाठी आॅनलाईन शिक्षण कसे असते याची माहिती दिली. सध्यातरी तालुक्यातील सर्व शिक्षक कोरोना संकटामुळे शैक्षणिक वातावरण कसे हाताळता येईल याबाबत चिंताग्रस्त आहेत.

विद्यार्थ्याविना शाळा ओस
दरवर्षी २६ जूनपासून शाळा सुरु होतात. मात्र यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने केवळ शिक्षकांना शाळेत बोलविले आहे. त्यानंतर टप्याटप्यात विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसरात मोठ्या प्रमाणा विद्यार्थ्यांचा गोंधळ दिसून यायचा मात्र यावर्षी शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्याचे दिसून आले.

Web Title: Books reached the students on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.