शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार अतिरुक्त बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:17+5:302021-04-17T04:28:17+5:30

चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ३० बेड तात्काळ सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार ...

Additional beds will be available in government medical colleges | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार अतिरुक्त बेड उपलब्ध

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार अतिरुक्त बेड उपलब्ध

googlenewsNext

चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ३० बेड तात्काळ सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. त्यानंतर प्रशासनाने त्या दिशेने काम सुरु केले असून रात्रीपर्यंत येथे कोरोना रुग्णांसाठी ३० बेड उपलब्ध होणार आहे. शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, महानगर पालिकेचे नोडल ऑफिसर धनंजय सरणाईक, समाजकल्यान विभागाचे नासरे यांची उपस्थिती होती.

संपूर्ण राज्यासह चंद्रपूरातही कोरोनाचा उद्रेक सुरु असून अपूऱ्या व्यवस्थेमूळे रुग्णांचे हाल होत आहे. त्यामूळे आहे त्या संसाधनांचा योग्य उपयोग करुन उत्तम रुग्णसेवा देण्याचे प्रयत्न करावा, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. दरम्याण त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णांच्या तुलनेत बेड कमी असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. त्यामूळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेड तात्काळ वाढविण्याच्या सुचना त्यांनी केल्यात. येथे १०० बेडची व्यवस्था आहे. त्यापैकी २१ बेड सुरु करण्यात आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता उर्वरित सर्व बेड तात्काळ सुरु करण्याच्या सुचना त्यांनी आहे.परिस्थीती गंभीर आहे. मात्र उत्तम नियोजनातून यावर मात केली जावू शकते, या ठिकाणी येणाऱ्या कोरोना रुग्णांवर उत्तम उपचार करावेत,अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

Web Title: Additional beds will be available in government medical colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.