अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल जमीर अब्दुल हमीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:19+5:302021-03-08T04:27:19+5:30

देवाडा : चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी सिद्धेश्वर देवाडा येथे सांस्कृतिक समाज भवनात झाली. या बैठकीत ...

Abdul Jameer Abdul Hameed as the minority cell state president | अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल जमीर अब्दुल हमीद

अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल जमीर अब्दुल हमीद

Next

देवाडा : चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी सिद्धेश्वर देवाडा येथे सांस्कृतिक समाज भवनात झाली. या बैठकीत गों.ग.पा. चे जिल्हा उपाध्यक्ष तथा पं.स. राजुराचे माजी सदस्य अब्दुल जमीर अब्दुल हमीद यांची गोंडवाना गणतंत्र पार्टी अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हरीश उईके व प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या बैठकीत गोंगपा प्रदेश कोषाध्यक्ष नरेश बमनोटे, नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज मडावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, माजी नगरपंचायत अध्यक्ष गजानन जुमनाके, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बापूराव मडावी, बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे, भीमराव मेश्राम, मारोती बेल्लाळे, ममता जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Abdul Jameer Abdul Hameed as the minority cell state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.