जिल्ह्यात पुन्हा नवे १८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:59+5:30

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल तालुक्यातील जानाळा येथील वधू पक्षातील दोन महिलेचा समावेश आहे. असे एकूण १८ बाधित रविवारी आढळून आले.

18 new positives in the district again | जिल्ह्यात पुन्हा नवे १८ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात पुन्हा नवे १८ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देआतापर्यंतची बाधित संख्या १८७ : चार दिवसात ५३ रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी १८ बाधित पुढे आले आहेत. एका दिवसातील ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत १६९ असणारी बाधितांची संख्या वाढून आता १८७ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग जिल्ह्यात आता चांगलाच वाढत असून मागील केवळ चार दिवसात ५३ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यात सध्या उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६ आहे. तर सध्या उपचार सुरु असणाऱ्या बाधितांची संख्या ९१ आहे. त्यापैकी चार हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे संपर्कातून व बाहेरून आलेल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व बाधितांची योग्य वैद्यकीय तपासणी सुरू असून सर्व संक्रमित वैद्यकीयदृष्टया स्थिर आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता येणाऱ्या नागरिकांची माहिती द्यावी. तसेच वैद्यकीय उपचाराला योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल तालुक्यातील जानाळा येथील वधू पक्षातील दोन महिलेचा समावेश आहे. असे एकूण १८ बाधित रविवारी आढळून आले.
चंद्रपूर शहरात पुढे आलेल्या बाधितामध्ये आकाशवाणी चौकातील एका कॉम्प्लेक्समधील ४९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. यापूर्वी एमआयडीसीतील एका उद्योग समूहातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील हा गृहस्थ आहे. याशिवाय डब्ल्यूसीएल कॉलनी ऊर्जानगर परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, २० वर्षीय महिला व १५ वर्षीय मुलगा एकाच कुटुंबातील आहेत. ते यापूर्वीच्या ऊर्जानगरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर शहरातीलच हनुमान मंदिर परिसरातील २० वर्षीय उत्तर प्रदेशातून आलेला एक मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या मुलाचा १० तारखेला स्वॅब घेण्यात आला होता.
याशिवाय पोलीस लाईनमधील चार जण पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहेत. अनुक्रमे २७, २३, २५ व ५९ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या तीन जवानाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह ठरले आहेत.

ग्रामीण भागातही वाढले रुग्ण
चंद्रपूर ग्रामीणमधील दाताळा भागातील ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह म्हणून पुढे आली आहे. अमरावती शहरातून ही महिला परत आली होती. जानाळा येथील लग्नामध्ये सहभागी झालेल्या भद्रावती येथील आणखी चार जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नवरदेवाचे वडील असणारे ६१ वर्षीय गृहस्थ, लग्नातील २२ वर्षीय आचारी, नातेवाईक असणारे ४७ वर्षीय पुरुष व ४७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय मूल तालुक्यातील जानाळा येथील २५ वर्षीय एक महिला पुन्हा पॉझिटिव्ह ठरली आहे. याच विवाह सोहळ्यातील नवरीकडील ती नातेवाईक होती. याच विवाह सोहळ्यातील बल्लारपुरातील एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. यासोबतच वरोरा येथील श्रीनगर येथून आलेला एक पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. सोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील महिला पॉझिटिव्ह आली आहे. ती हैदराबाद येथून आली होती. जिल्ह्यातील कोरोनाबाधित १८७ झाले आहेत. आतापर्यत ९६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.

Web Title: 18 new positives in the district again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.