Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरचा मॉडलिंगमध्ये डेब्यू; बनिता संधूसह दिसली जाहिरातीत, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:44 AM2021-12-07T08:44:27+5:302021-12-07T08:44:53+5:30

Sara Tendulkar : एका क्लोदिंग ब्रँडच्या जाहिरातीत झळकली सारा तेंडुलकर.

sachin tendulkar daughter sara tendulkar ajio modeling debut ad shoot with ahan shetty girlfriend banita sandhu | Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरचा मॉडलिंगमध्ये डेब्यू; बनिता संधूसह दिसली जाहिरातीत, पाहा Video

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरचा मॉडलिंगमध्ये डेब्यू; बनिता संधूसह दिसली जाहिरातीत, पाहा Video

googlenewsNext

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) कन्या सारा तेंडुलकरनं (Sara Tendulkar) हीनं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. सारा तेंडुलकरनं आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून एक व्हिडिओही शेअर केलाय. यामध्ये ती एका क्लोदिंग ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.

यामध्ये सारा तेंडुलकरसह बॉलिवूडचा अभिनेता सुनिल शेट्टी (Suniel Shetty) याचा मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) याची गर्लफ्रेन्ड आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) प्रदर्शित झालेला चित्रपट सरदार उधम (Sardar Udham) मधील रेश्माची भूमीका साकारणारी अभिनेत्री बनिता संधू (Banita Sandhu), तानिया श्रॉफही सोबत दिसत आहे. सारा तेंडुलकरनं शेअर केलेला हा व्हिडीओ अवघ्या काही वेळात सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. संबंधित क्लोदिंग कंपनीनंही सारा तेंडुलकरला लाँच करत तिचा फोटो शेअर केला आहे.


सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. अनेकदा इन्स्टा स्टोरिज, व्हिडीओ आणि फोटोही ती शेअर करताना दिसते. यावेळी तिनं या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यापूर्वीय डेट नाईट फोटोही व्हायरल झाले होते. यात ती बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिच्यासोबत दिसली होती. 

बनिता संधू एक ब्रिटीश आणि भारतीय अभिनेत्री आहे. तिनं इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटांमध्ये भूमीका साकारल्या आहेत. तिनं २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऑक्टोबर' या चित्रपटातून डेब्यू केला होता. यात ती वरुण धवनसोबत दिसली होती. याशिवाय ती अमेरिकन टीव्ही सीरिज पँडोरामध्येही झळकली होती.

Web Title: sachin tendulkar daughter sara tendulkar ajio modeling debut ad shoot with ahan shetty girlfriend banita sandhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.