फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर नाराज अभिनेत्यानं चक्क मोदी-ममतांकडे मागितली दाद; नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:20 PM2021-11-07T15:20:59+5:302021-11-07T15:21:55+5:30

होय, Prosenjit Chatterjee एका फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर नाराज झाला आणि रागारागात त्यानं एक ट्विट केलं. त्याच्या या ट्विटने इंटरनेटच्या दुनियेत खळबळ निर्माण केली आहे.

Prosenjit Chatterjee's letter to PM, Bengal CM complaining about food delivery app goes viral gets troll | फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर नाराज अभिनेत्यानं चक्क मोदी-ममतांकडे मागितली दाद; नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर नाराज अभिनेत्यानं चक्क मोदी-ममतांकडे मागितली दाद; नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

googlenewsNext

ट्विटरवर सध्या बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी  (Prosenjit Chatterjee)ट्रेंड करतोय. कारणही तसंच आहे. होय, प्रोसेनजीत एका फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर नाराज झाला आणि रागारागात त्यानं एक ट्विट केलं. त्याच्या या ट्विटने इंटरनेटच्या दुनियेत खळबळ निर्माण केली आहे. होय, प्रोसेनजीतने यासंदर्भात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्याकडे दाद मागितली आहे. प्रोसेनजीतचं ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. शिवाय यावरून तो जबरदस्त ट्रोलही होतोय.

काय आहे प्रकरण?
तर प्रोसेनजीतने फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीवरून जेवण मागवलं होतं. काही वेळानंतर आॅर्डर डिलिव्हर्ड असा मॅसेज त्याला आला. पण जेवण मात्र पोहोचलंच नव्हतं. या प्रकारानं प्रोसेनजीत चांगलाच बिथरला आणि त्याने थेट सोशल मीडियावर याची तक्रार करत, या ट्विटमध्ये चक्क मोदी आणि ममतांना टॅग केलं.

ट्विटमध्ये तो लिहितो...
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि
माननीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,

सणासुदीच्या शुभेच्छा. तुम्ही ठीक असाल अशी आशा करतो. आज मी स्वत: सहन केलेल्या एका समस्येकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो.   ३ नोव्हेंबर रोजी, मी फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीवर एक ऑर्डर दिली होती. थोड्या वेळानंतर ऑर्डर डिलिव्हर्ड झाल्याचं मला दिसलं परंतु माझ्यापर्यंत ऑर्डर पोहोचली नव्हती. स्विगीकडे याबाबत मी तक्रार दाखल केली. मी ऑर्डरचे पैसे आधीच दिले होते म्हणून त्यांनी मला पैसे परत केले. पण तरिही ही पोस्ट शेअर करतोय.  कारण मला वाटतं की कोणीही या समस्येचा सामना करू शकतो. जर कोणी त्यांच्या पाहुण्यांसाठी फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून काही ऑर्डर केलं आणि जेवण आलंच नाही तर काय? जर कोणी पूर्णपणे फूड अ‍ॅप्सवर अवलंबून असेल तर काय होईल? त्यांनी उपाशी राहायचं का? अशा अनेक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या मुद्यावर बोलण्याची गरज वाटली.’ 
 
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

 प्रोसेनजीत ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी इतक्या भन्नाट कमेंट्स केल्यात की, हसून हसून पोट दुखावं. काहींनी प्रोसेनजीतची खिल्ली उडवत, खरंच ही एक जागतिक समस्या असल्याचं म्हटलं. तू पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना कळवलं ते बरं केलंस, असं एकाने उपहासाने लिहिलं.
या प्रकरणाचा सीबीआय तपास व्हायला हवा, अशी कमेंट एका चाहत्याने केली. प्रोसेनजीत, कृपया युएन आणि जो बायडेन यांना सुद्धा टॅग कर, असं काहींनी त्याला सुचवलं.

Web Title: Prosenjit Chatterjee's letter to PM, Bengal CM complaining about food delivery app goes viral gets troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.