... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 02:16 PM2022-01-08T14:16:56+5:302022-01-08T14:17:51+5:30

... की निवडणुकांच्या निकालापर्यंत कोरोनाचे व्हेरिअंट लपून बसतील, बालमनाला पडलेला प्रश्न आहे म्हणत व्यक्त केला संताप.

marathi actor sandeep pathak speaks about coronavirus restriction theatres 50 people capacity | ... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना

फोटो सौजन्य - संदीप पाठक, फेसबुक

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं दिसून येतंय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काही निर्बंध घालून दिले आहेत, तर अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनानेही अधिक कडक निर्बंध घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्याची परवानगी मिळाली होती. परंतु आता अनेक ठिकाणी पुन्हा निर्बंध लागत असल्यानं यावर संकट ओढावलं आहे. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यानं घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संदीप पाठक वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकामध्ये भूमिका साकारात आहे. या नाटकाचे कोल्हापूर भागात प्रयोग आयोजित करण्यात आले होते. परंतु निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हे प्रयोग रद्द करावे लागत असल्याची खंत त्यानं व्यक्त केली. "कोल्हापूर भागात नाट्यगृहात ५० टक्के आसनक्षमतेच्या ऐवजी फक्त ५० प्रेक्षकांना परवानगी. कसं परवडणार???? म्हणून आम्ही कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणचे 'वऱ्हाड'चे प्रयोग रद्द करत आहोत. क्षमस्व," असं ट्वीट त्यानं केलं आहे.

 

"निवडणूक काळात कोरोनाचा कोणता नवीन व्हेरिअंट येईल? की निकाललागेपर्यंत कोरोनाचे व्हेरिअंट लपून बसतील? माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न.... #WearMask (आम्हा सामान्यांकरिता) #SocialDistancing (आम्हा सामान्यांकरिता)," असं म्हणत त्यानं संतापही व्यक्त केलाय.

Web Title: marathi actor sandeep pathak speaks about coronavirus restriction theatres 50 people capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.