'जीव झाला येडा पिसा' मालिकेतील शिवाची बहीण सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:00 AM2021-11-09T07:00:00+5:302021-11-09T07:00:00+5:30

जीव झाला येडा पिसा या मालिकेत शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग हिने साकारली होती.

'Jeev Zhala Yeda Pisa' serial fame Shiva's sister Soni fell in love with the actor | 'जीव झाला येडा पिसा' मालिकेतील शिवाची बहीण सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात

'जीव झाला येडा पिसा' मालिकेतील शिवाची बहीण सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात

googlenewsNext

जीव झाला येडा पिसा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहेत. या मालिकेत शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग हिने साकारली होती. शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची आहे. शाळेत असल्यापासूनच शर्वरी बालनाट्यातून काम करत होती. तिचे वडील नाट्य क्षेत्राशी निगडित होते. त्यामुळे तिला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती. मालिकेत येण्याअगोदर शर्वरीने प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम केले आहे.

बीएससीची पदवी मिळवलेल्या शर्वरीला पेंटिंगची आवड होती त्यासाठी कला निकेतनमधून तिने फाईन आर्टस् चे शिक्षण घेतले आहे. जीव झाला वेडा पिसा या मालिकेतील सोनीच्या भूमिकेने शर्वरीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. विधिलिखित या वेबसिरीजमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या सन मराठी वाहिनीवरील जाऊ नको दूर…बाबा या मालिकेतून ती अर्पिताच्या बहिणीची भूमिका निभावत आहे.

शर्वरी जोग हिने नुकतीच अभिनेता गौरव मालणकरच्या प्रेमात असल्याची कबुली सोशल मीडियावर दिली आहे. तर गौरवने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देत लिहिले की, दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या वर्षी तरी “आली माझ्या घरी ही दिवाळी” हे म्हणायची संधी मिळेल का? आणि पुढच्या दिवाळीला “एकाच फोटोत” मी कुर्त्यामध्ये आणि तु साडी मध्ये असण्याची आशा करायला हरकत नाही कारण तलाव पाळीची मजा रंकाळ्यात नाही..” असे तो म्हणतो. शर्वरीच्या भुऱ्या डोळ्यांनी त्याला पुरते घायाळ केले असल्याचेही तो सांगतो. 

गौरव मालणकर हा नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे

गौरव मालणकर हा नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे. झी युवा वरील फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत त्याने काम केले होते. गौरव मालणकर हा इंजिनिअरिंग शिकत असताना युथ फेस्टिव्हलमध्ये एकांकिका करण्यासाठी सहभागी झाला. मात्र पुढेही थिएटर करायची इच्छा व्यक्त केली होती. परंतु अभिनय क्षेत्रात येण्याला त्याच्या घरच्यांकडून विरोध होता. या काळातही त्याने पथनाट्य, एकांकिका आणि आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा गाजवल्या होत्या. फुलपाखरू ही त्याची पहिली मालिका आहे.त्यानंतर तू माझा सांगाती, साईबाबा श्रद्धा आणि सबुरी, दहा बाय दहा, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा मालिका, चित्रपट आणि व्यावसायिक नाटकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला. स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्याला जिवा महाला ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली.

Web Title: 'Jeev Zhala Yeda Pisa' serial fame Shiva's sister Soni fell in love with the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.