VIDEO: सर्वांसमोर पापा बोनी कपूर यांच्यावर भडकली Janhvi Kapoor, पापाराझींनाही फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:00 AM2021-10-20T11:00:16+5:302021-10-20T11:01:30+5:30

Janhvi Kapoor Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल जान्हवीचं कौतुक

Janhvi Kapoor gets angry on boney kapoor for removing mask says galat advice mat dijiye to paparazzi | VIDEO: सर्वांसमोर पापा बोनी कपूर यांच्यावर भडकली Janhvi Kapoor, पापाराझींनाही फटकारलं

VIDEO: सर्वांसमोर पापा बोनी कपूर यांच्यावर भडकली Janhvi Kapoor, पापाराझींनाही फटकारलं

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच गुडलक जेरी, तख्त, दोस्ताना 2 आणि  रणभूमी  सारख्या चित्रपटांमध्ये जान्हवी दिसणार आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) हिची आता नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणाई तिच्यासाठी वेडी आहे. जान्हवी अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट होते. कधी जिमबाहेर, कधी सलून बाहेर, कधी हॉटेलबाहेर. आता तिचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात जान्हवी तिच्या वडिलांसोबत म्हणजेच बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत दिसतेय. 
पापासोबत जान्हवी एअरपोर्टवरून बाहेर पडत असताना पापाराझी दोघांनाही घेरतात आणि पोज देण्याची गळ घालतात. काही पापाराझी बोनी कपूर यांना मास्क उतरवून पोज देण्यास सांगतात. बोनी कपूरही राजी होतात. पण ते मास्क उतरणार तोच जान्हवी कपूर खवळते.

पापा बोनी कपूर यांच्यावर ती चांगलीच संतापते आणि पुन्हा मास्क घालायला लावते. काहीही होणार नाही, असं फोटोग्राफर्स तिला म्हणतात. मग काय, जान्हवी या फोटोग्राफर्सलाही सुनावते. ‘होतं... असा चुकीचा सल्ला देऊ नका,’ असं ती रागारागात म्हणते. यानंतर बोनी व जान्हवी दोघेही पोज देतात. पण मास्क घालूनच... श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी वडिलांची प्रचंड काळजी घेताना दिसते.  एअरपोर्टवर हे प्रत्यक्ष दिसलं, एवढंच.
व्हिडीओत फोटोग्राफर्स जान्हवीला तिचा टॅटू दाखवण्याचीही गळ घालतात. पण जान्हवी नकार देते. खूप दाखवला मी, इन्स्टाग्रामवरही टाकला आहे, असं म्हणून ती पापासोबत गाडीत बसून निघून जाते.
जान्हवीने अलीकडे तिची आई श्रीदेवी हिच्या आठवणीत एक टॅटू बनवला आहे. या टॅटूमध्ये तिने ‘आय लव्ह यू माय लब्बू’ असं लिहिलं आहे.
श्रीदेवी पे्रमाने जान्हवीला लब्बू नावानं हाक मारायच्या. जान्हवीने काही दिवसांआधी  आई श्रीदेवीची एक चिठ्ठी शेअर केली होती ज्यावर लिहिले होते ‘आय लव्ह यू माय लबू, यू आर द बेस्ट बेबी’.
जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूआधीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. जान्हवीचा पहिला सिनेमा पाहण्याची श्रीदेवींची इच्छा होती. पण त्यापूर्वीचं त्यांचं निधन झालं. जान्हवीने ‘धडक’ या सिनेमातून पदार्पण केलं.  यानंतर रुही  आणि  गुंजन सक्सेना  या चित्रपटांमध्ये ती दिसली. लवकरच गुडलक जेरी, तख्त, दोस्ताना 2 आणि  रणभूमी  सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसणार आहे.

Web Title: Janhvi Kapoor gets angry on boney kapoor for removing mask says galat advice mat dijiye to paparazzi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.