Cruise rave party: 'गोड पदार्थ करायचे नाहीत'; Gauri khanची सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:10 PM2021-10-20T12:10:04+5:302021-10-20T12:10:46+5:30

Cruise rave party : जोपर्यंत आर्यनची या प्रकरणातून सुखरुपपणे सुटका होत नाही. तोपर्यंत मन्नतमध्ये कोणताही गोड पदार्थ करायचा नाही अशी सक्त ताकीद गौरीने घरातील कुकला दिली आहे. 

Cruise rave party gauri khan is upset with shahrukh khan son aryan khan arrest she instructed staff to not cook any sweet dish | Cruise rave party: 'गोड पदार्थ करायचे नाहीत'; Gauri khanची सक्त ताकीद

Cruise rave party: 'गोड पदार्थ करायचे नाहीत'; Gauri khanची सक्त ताकीद

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी मन्नतवर कोणत्याही सण, उत्सवाचं सेलिब्रेशन होणार नसल्याचं दिसून येत आहे.

 २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा (Cruise rave party) डाव उधळून लावला. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानचादेखील (aryan khan) समावेश होता. सध्या आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये (arthur road jail) ठेवण्यात आलं आहे.  त्यामुळे सध्या किंग खानच्या घरामध्ये तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणातून आर्यनची सुखरुपपणे सुटका व्हावी यासाठी शाहरुख कसोशीने प्रयत्न करत आहे. तर गौरी नवस, उपवास करुन देवाचा धावा करत आहे. यामध्येच आता जोपर्यंत आर्यनची या प्रकरणातून सुखरुपपणे सुटका होत नाही. तोपर्यंत मन्नतमध्ये कोणताही गोड पदार्थ करायचा नाही अशी सक्त ताकीद गौरीने घरातील कुकला दिली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र सणासुदीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरी गोडधोड पदार्थ केले जात आहेत. मात्र, कोणताही सणवार असला तरीदेखील जोपर्यंत आर्यन घरी येत नाही तोपर्यंत घरात गोड पदार्थ केले जाणार नाहीत असं गौरीने बजावलं आहे. त्यामुळे यावेळी मन्नतवर कोणत्याही सण, उत्सवाचं सेलिब्रेशन होणार नसल्याचं दिसून येत आहे.

Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू

काही दिवसांपूर्वी मन्नतमधील एक कूक खीर करत होता. मात्र, ही खीर करुन नकोस तसं यापुढे मी सांगेन तोपर्यंत गोड पदार्थ करायचे नाहीत, असे आदेश तिने दिले.

दरम्यान, मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु होती. या पार्टीचा डाव एनसीबीने उधळून लावला.विशेष म्हणजे या पार्टीमध्ये आर्यन खान सहभागी असल्याचं दिसून आलं.  त्यामुळे एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. सध्या आर्यन ऑर्थर रोड तुरुंगात असून सर्व सामान्य कैद्यांप्रमाणे राहत आहे.
 

Web Title: Cruise rave party gauri khan is upset with shahrukh khan son aryan khan arrest she instructed staff to not cook any sweet dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.