Riteish Deshmukh : 'ही दोस्ती तुटायची नाय...;' लातूरच्या बाभळगावातील मित्राला रितेशनं दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:31 AM2022-01-13T08:31:16+5:302022-01-13T08:32:09+5:30

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आपलं एक वेगळंच स्थान कायम केलं आहे.

bollywood marathi actor riteish deshmukh wishes his best childhood friend on his birthday photo goes viral | Riteish Deshmukh : 'ही दोस्ती तुटायची नाय...;' लातूरच्या बाभळगावातील मित्राला रितेशनं दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

Riteish Deshmukh : 'ही दोस्ती तुटायची नाय...;' लातूरच्या बाभळगावातील मित्राला रितेशनं दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

googlenewsNext

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आपलं एक वेगळंच स्थान कायम केलं आहे. त्यानं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर यशाचं शिखर गाठलंय. रितेश अनेकदा सोशल मीडियाद्वारे (Social Media) आपलं मत व्यक्त करत असतो. रितेशनं इतकं मोठं नाव कमावलं असलं तरी आपली पाळंमुळं मात्र तो विसलेला नाही. अभिनय क्षेत्रात तो इतका पुढे गेला असला तरी आपल्या जुन्या मित्रांना मात्र तो विसरलेला नाही आणि सोशल मीडियावर त्यानं शेअर केलेल्या एका पोस्टवरून याची प्रचिती येते. त्याच्या या पोस्टचं अनेकांकडून कौतुकही होत आहे.

रितेशनं सोशल मीडियावर लातूरच्या बाभळगावातील मित्रासोबतचा फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रकाश इरेकर असं रितेशच्या मित्राचं नाव असून रितेशनं त्याच्यासोबत एक फोटो शेअर केला. "वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकाश इरेकर. माझँ गाव बाभळगाव लातूरातील हा माझा बालपणीचा मित्र. अनेक वर्षे आली आणि गेली परंतु आपली मैत्री मात्र कायम आहे," असं रितेशनं पोस्टसोबत लिहिलं आहे.

रितेशसाठी आपला मित्र आणि मैत्री किती महत्त्वाची आहे हे यातून दिसून येतंय. आपण आयुष्यात कितीही पुढे गेलो तरी आपल्या आयुष्यातील काही मित्रांचं स्थान कायम राहतं हेच यातून प्रकर्षानं जाणवतं.

Web Title: bollywood marathi actor riteish deshmukh wishes his best childhood friend on his birthday photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.