वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतीत चेहरा..., शाहरूख खानच्या या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:53 PM2021-10-24T14:53:35+5:302021-10-24T14:54:54+5:30

Aryan Khan drugs case, Shahrukh Khan : सोशल मीडियावर शाहरूखचा एक फोटोही जबरदस्त व्हायरल होतोय. गेल्या 21 ऑक्टोबरला शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. तेव्हाचाच हा फोटो असल्याचा दावा केला जातोय. 

Aryan Khan drugs case: fact check know the truth behind this viral photo of Shahrukh Khan Claiming it is from Arthur Road Jail during meeting with Aryan Khan | वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतीत चेहरा..., शाहरूख खानच्या या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या

वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतीत चेहरा..., शाहरूख खानच्या या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या 21 ऑक्टोबरला शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. शाहरूख व आर्यन बापलेकांची सुमारे 18 मिनिटं भेट झाली.

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan drugs case ) शाहरूख खानचा (Shah Rukh Khanलाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) तुरुंगात आहे. जामीन मिळेपर्यंत आर्यनचा मुक्काम तुरूंगातच असणार आहे. तूर्तास या प्रकरणाच्या निमित्ताने  वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा होतोय. इतकंच नाही अगदी मीडियापासून सोशल मीडियापर्यंत शाहरूख, आर्यन, गौरी यांच्याबद्दलची चर्चा सुरू आहे. अशात सोशल मीडियावर शाहरूखचा एक फोटोही जबरदस्त व्हायरल होतोय. गेल्या 21 ऑक्टोबरला शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात ( Arthur Road Jail) गेला होता. तेव्हाचाच हा फोटो असल्याचा दावा केला जातोय. 

आर्यन तुरुंगात गेल्यापासून शाहरूख तहानभूक विसरलाय. रात्रीची झोप विसरलायं, असं वृत्त किंगखानच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने अलीकडे मीडियानं दिलं होतं. गेल्या गुरुवारी शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी पहिल्यांदा आर्थर रोड तुरुंगात पोहोचला, तेव्हा शाहरूखच्या चेह-यावर मास्कनं झाकलेला होता. डोळ्यांवर गॉगल होता. त्यामुळे कुणालाच त्याचा चेहरा दिसला नाही. पण सोशल मीडियावर शाहरूखचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत शाहरूखची दाढी वाढलेली दिसतेय. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आहेत. डोळे लाल दिसत आहेत. हा फोटो शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचला तेव्हाचा असल्याचा दावा केला जातोय. पण सत्य काही वेगळंच आहे.

होय, हा फोटो ताजा नसून 2017 सालचा आहे. 15 मार्च 2017 रोजी शाहरूख खान आलिया भटच्या बर्थ डे पार्टीत सामील झाला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. तेव्हाही शाहरूखचा हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. हाच जुना फोटो आर्यन प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा व्हायरल होतोय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख व आर्यन बापलेकांची सुमारे 18 मिनिटं भेट झाली. अलीकडे शाहरूख होता तर पलीकडे आर्यन आणि दोघांच्या मध्ये काचेची भिंत होती. दोघेही इंटरकॉमच्या मदतीने एकमेकांशी बोलले. जेलचे अधिकारी यावेळी हजर होते. आर्यनला पाहताच शाहरूख प्रचंड भावुक झाला. आर्यनची अवस्थाही वेगळी नव्हती. 

Web Title: Aryan Khan drugs case: fact check know the truth behind this viral photo of Shahrukh Khan Claiming it is from Arthur Road Jail during meeting with Aryan Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.