‘अग्गंबाई सासूबाई’च्या बबड्याची नवी इनिंग, सोशल मीडियावर केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:43 PM2021-11-08T14:43:24+5:302021-11-08T14:44:09+5:30

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका कधीच संपली. पण या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राची चर्चा आजही होते. बबड्याची ही भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने (Ashutosh Patki) साकारली होती.

Aggabai Sasubai fame babadya actor Ashutosh Patki turns producer | ‘अग्गंबाई सासूबाई’च्या बबड्याची नवी इनिंग, सोशल मीडियावर केली घोषणा

‘अग्गंबाई सासूबाई’च्या बबड्याची नवी इनिंग, सोशल मीडियावर केली घोषणा

googlenewsNext

अग्गंबाई सासूबाई’  ( Aggabai Sasubai ) ही मालिका प्रचंड गाजली होती. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका कधीच संपली. पण या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राची चर्चा आजही होते. या मालिकेइतके मीम्स क्वचितच अन्य कुठल्या मालिकेवर बनले असतील. बबड्यावरचे हसून लोटपोट करणारे मीम्स तर शेकडोंच्या संख्येने सापडतील. आईच्या अति लाडाने लाडावलेला  बबड्याचीच घरोघरी चर्चा होती. बबड्याची ही भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने (Ashutosh Patki) साकारली होती. आता हाच बबड्या अर्थात आशुतोष एक नवी इनिंग सुरू करतोय. होय, बबड्या आता निर्माता झाला आहे. नुकतीच त्याने सोशल अकाऊंट त्याच्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली.

 आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरु केल्याचं सांगितलं आहे. ‘नमस्कार रसिक प्रेक्षकहो.. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या मुहूर्तावर मला तुम्हाला हे सांगायला आनंद होतोय की आज मी एका नवीन उपक्रमाची सुरुवात करतोय. ‘आशुतोष पत्की एंटरटेनमेंट’च्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी छान कंटेन्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचा ‘श्री गणेशा’  दिवाळीच्या मुहूर्तावर होतोय.. तुमची साथ कायम असू द्या...’, अशा आशयाची पोस्ट आशुतोषने शेअर केली आहे.
  आशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून ‘अग्गंबाई सासूबाई’च्या आधी तो काही मालिकांमध्ये दिसला होता. ‘वन्स मोअर’ या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. अभिनय हे आशुतोषचे पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अ‍ॅकेडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत त्याने काम केलं. पण त्याला ख-या अर्थाने लोकप्रियता ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे मिळाली. 

Web Title: Aggabai Sasubai fame babadya actor Ashutosh Patki turns producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.