WCL Recruitment 2021: संकटात संधी! कोळसा क्षेत्रातील ‘या’ सरकारी कंपनीत मोठी भरती; कसा करावा अर्ज? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:51 PM2021-10-13T17:51:45+5:302021-10-13T17:52:56+5:30

WCL Recruitment 2021: कोळसा टंचाईच्या काळात याच क्षेत्रातील एका सरकारी कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे.

wcl recruitment 2021 coal india subsidiary western coalfields hiring 211 mining sirdar and surveyor | WCL Recruitment 2021: संकटात संधी! कोळसा क्षेत्रातील ‘या’ सरकारी कंपनीत मोठी भरती; कसा करावा अर्ज? पाहा

WCL Recruitment 2021: संकटात संधी! कोळसा क्षेत्रातील ‘या’ सरकारी कंपनीत मोठी भरती; कसा करावा अर्ज? पाहा

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशावरील कोळसा संकट गडद होत चालले आहे. यामुळे देशभरातील अनेक ठिकाणची वीज गायब होण्याची शक्यता आहे. मात्र, या कोळसा टंचाईच्या काळात याच क्षेत्रातील एका सरकारी कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. भारत सरकारच्या कोल इंडिया लिमिटेडची सब्सिडियरी आणि एक मिनिरत्न कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL Recruitment 2021) ने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आपल्या खाणी क्षेत्रात ग्रुप सी आणि ग्रुप बी पदांवरील भरतीसाठी जाहिरात दिली आहे.  

भरतीच्या जाहिरातीनुसार, ग्रुप बीमध्ये सर्वेयर (माइनिंग) आणि ग्रुप सीमध्ये माइनिंग सरदारच्या एकूण २११ रिक्त जागांवर ही भरती होणार आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स भरती अधिसूचना २०२१ नुसार माइनिंग सरदार पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे माइनिंग सरदारचे वैध प्रमाणपत्र किंवा माइनिंग व माइन सर्वेइंग डिप्लोमा आणि डीजीएमएस ने जारी केलेले संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. 

शेवटची तारीख कधी आणि कुठे करावा अर्ज?

अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडची अधिकृत वेबसाइट westerncoal.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल आणि उमेदवार २० नोव्हेंबर पर्यंत आपले अॅप्लिकेशन सबमिट करू शकतील. उमेदवारांनी ऑनलाइन सबमिट केलेल्या अॅप्लिकेशनची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून सेव्ह करावी. या भरतीसाठी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहिरात काढण्यात आली आहे. 

पात्रतेचे निकष काय? 

सर्वेयर (माइनिंग) पदांसाठी उमेदवारांकडे दहावीसह डीजीएमएसने जारी केलेले संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय ११ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांहून अधिक नसावे. आरक्षित वर्गांसाठी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. अधिक माहितीसाठी वेस्टर्न कोलफील्ड्स भरतीची अधिसूचना पाहावी, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: wcl recruitment 2021 coal india subsidiary western coalfields hiring 211 mining sirdar and surveyor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी