बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, युनियन बँकेत बंपर भरती; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:32 AM2021-08-13T10:32:15+5:302021-09-25T15:21:12+5:30

Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Union Bank of India Recruitment 2021: Job opportunities in the banking sector, bumper recruitment in Union Bank; Such is the eligibility and conditions | बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, युनियन बँकेत बंपर भरती; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, युनियन बँकेत बंपर भरती; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

Next

मुंबई - बँकिंग विभागात नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Union Bank of India Recruitment 2021) युनियन बँक भरती २०२१ साठी अर्ज unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे. (government jobs update) नोटिफिकेशननुसार युनियन बँक भरती २०२१ अंतर्गत एकूण ३४७ पदे भरली जाणार आहेत. ही भरती एमएमजीएस-III आणि एमएमजीएस -II व एमएमजीएस-I ग्रेड अंतर्गत होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँकेच्या कुठल्याही शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे. (Job opportunities in the banking sector, bumper recruitment in Union Bank; Such is the eligibility and conditions)

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ पासून झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही ३ सप्टेंबर २०२१ आहे.
या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या पदांचे विवरण हे पुढील प्रमाणे आहे. 
सिनियर मॅनेजर (रिस्क) - ६० पदे 
मॅनेजर (रिस्क) - ६० पदे
मॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) - ०७ पदे
मॅनेजर (आर्किटेक्ट) - ०७ पदे 
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) -०२ पदे 
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) -०१ पद
मॅनेजर (फॉरेस्क) -५० पदे 
मॅनेजर (सीए) - १४ पदे  
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) -२६ पदे
असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) १२० पदे

शैक्षणित पात्रता
सिनियर मॅनेजर (रिस्क) - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क मधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन  
मॅनेजर (रिस्क) - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेटमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इंस्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन 
मॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन
मॅनेजर (आर्किटेक्ट) - आर्किटेक्टमध्ये बॅचल डिग्री किमान ६० टक्के गुणांसह   
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) - इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह बीई/बी.टेक 
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) - प्रिटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बीई किंवा बीटेक 
मॅनेजर (फॉरेस्क) - फुल टाइम एमबीए कोर्स
मॅनेजर (सीए) - सीएची पदवी    
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) - सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मॅकॅनिकल/प्रॉडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स पैकी कुठल्याही विषयामधून इंजिनियरिंगची पदवी
असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स)- फुल टाइम एमबीएची पदवी.

या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या पदांसाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. 
- सिनियर मॅनेजर - ३० ते ४० वर्षे
- मॅनेजर - २५ ते ३५ वर्षे
- असिस्टंट मॅनेजर २० ते ३० वर्षे 

या भरतीसाठीचे प्रवेश शुल्क हे सर्वसामान्य, इडब्ल्यूएस आणि ओबीसींसाठी ८५० रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी निशुल्क आहे.  

Web Title: Union Bank of India Recruitment 2021: Job opportunities in the banking sector, bumper recruitment in Union Bank; Such is the eligibility and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app