SBI PO Recruitment 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदांसाठी निघाली मोठी भरती; ४२ हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:51 AM2021-10-05T10:51:38+5:302021-10-05T10:52:05+5:30

SBI PO Recruitment 2021: पाहा नोटीफिकेशन आणि जाणून घ्या कसा करू शकाल अर्ज.

SBI PO Recruitment 2021: Big recruitment for officer posts in SBI; Salary up to 42 thousand | SBI PO Recruitment 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदांसाठी निघाली मोठी भरती; ४२ हजारांपर्यंत पगार

SBI PO Recruitment 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदांसाठी निघाली मोठी भरती; ४२ हजारांपर्यंत पगार

googlenewsNext
ठळक मुद्देपाहा नोटीफिकेशन आणि जाणून घ्या कसा करू शकाल अर्ज.

SBI PO Notification 2021, Sarkari Naukri 2021: स्टेट बँक ऑफ इंडियानं (State bank of india) प्रोबेशनरी ऑफिरसच्या (PO) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यासाठी अर्जप्रक्रिया ५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तसंच अर्ज करण्याची अखेरची तारीख २५ ऑक्टोबर असेल. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन पाहून अर्ज करता येईल. यामध्ये एकूण प्रोबेशनरी ऑफिसरच्या २०५६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

SBI PO पदांसाठी प्रिलिम्स परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. २०५६ जागांपैकी २०० जागा या EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑफिसर पदांवर नोकरी मिळण्यासाठी उमेदवारांना प्रिलिम्स, मेन, इंटरव्ह्यू राऊंड आणि प्री एक्झाम ट्रेनिंगही क्लिअर करावी लागणार आहे. याची संपूर्ण निवड प्रक्रिया नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळेल.

अर्ज करणाऱा उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असणं अनिवार्य आहे. जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये असतील त्यांना देखील काही अटींचं पालन करून अर्ज करता येणार आहे. जर त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं, तर त्यांना ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी परीक्षा दिल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा २१ ते ३० ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूटही देण्यात येणार आहे.

किती असेल वेतन?
ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना चार आगाऊ वेतनवाढीसह २७,६२० रूपये बेसिक पे दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांचा पगार २३,७०० ते ४२.०२० रूपये यांदरम्यान असेल. याशिवाय उमेदवारांना DA, HRD, CCA आणि अन्य भत्तेही दिले जातील. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना निवडीच्या वेळी दोन लाख रूपयांच्या बॉन्डवर सही करावी लागेल. त्यानुसार उमेदवारांना किमान तीन वर्षांसाठी बँकेत नोकरी करावी लागणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Web Title: SBI PO Recruitment 2021: Big recruitment for officer posts in SBI; Salary up to 42 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.