Maha IT Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:52 PM2022-05-17T12:52:38+5:302022-05-17T12:57:48+5:30

Maha IT Recruitment 2022: महा आयटी भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या...

maha it recruitment 2022 various post vacant job in maharashtra information technology corporation ltd know details | Maha IT Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती; पाहा, डिटेल्स

Maha IT Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती; पाहा, डिटेल्स

googlenewsNext

मुंबई: रोजगाराच्या शोधात असलेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, एमटेक पर्यंतचे शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. महा आयटीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. नेमक्या कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया केली जात असून, त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महा आयटी कॉर्पोरेशन अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी

चीफ ऑपरेटींग ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बीटेक/एमटेक पर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. यासोबतच उमेदवाराकडे चीफ ऑपरेटींग ऑफिसर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असावा. तसेच चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बीटेक/एमटेक असणे आवश्यक आाहे. यासोबतच उमेदवाराकडे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असायला हवा. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२० या पत्त्यावर पाठवायचा आहे. २५ मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: maha it recruitment 2022 various post vacant job in maharashtra information technology corporation ltd know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.