दिसायला सोपे, पण प्रत्यक्षात अवघड; UPSC च्या मुलाखतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:45 IST2025-12-09T13:45:29+5:302025-12-09T13:45:41+5:30
UPSC मुलाखतीत फक्त तुमचे ज्ञान नाही, तर विचारसरणी, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व तपासले जाते.

दिसायला सोपे, पण प्रत्यक्षात अवघड; UPSC च्या मुलाखतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते?
UPSC Exam: भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC मध्ये प्रिलिम्स आणि मेन्स पार केल्यानंतर खरी कसोटी मुलाखतीत असते. UPSC च्या मुलाखतीत फक्त ज्ञान नाही, तर तुमची विचारशक्ती, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व पाहिले जाते.
अनेक उमेदवार मेन्समध्ये उत्तम गुण मिळवतात, पण इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या काही कडक प्रश्नांपुढे गोंधळतात आणि IAS बनण्याचे स्वप्न अधुरे राहते. त्यामुळे UPSC इंटरव्ह्यूची तयारी रणनीतीपूर्वक आणि स्मार्ट पद्धतीने करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे IAS इंटरव्ह्यूमध्ये वारंवार विचारले जातात.
1. तुम्हाला IAS का बनायचे आहे? प्रेरणा कुणाकडून मिळाली?
हा प्रश्न ऐकताच अनेक उमेदवार देशसेवा, राष्ट्रनिर्माण, बालपणापासूनचे स्वप्न अशी कारणे सांगू लागतात. मात्र, इंटरव्ह्यू पॅनेलला खोटा उत्साह नाही, तर खरी प्रेरणा जाणून घ्यायची असते. या प्रश्नाला प्रामाणिक, स्पष्ट आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित उत्तर हेच सर्वात प्रभावी मानले जाते.
2. कोणता राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मुद्दा तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो?
हा प्रश्न तुमची जागरुकता, चालू घडामोडीवरील पकड आणि विश्लेषण कौशल्य तपासतो. अलीकडे चर्चेत असलेला मुद्दा निवडा. तो अतिशय तांत्रिक न करता संतुलित, तथ्यपूर्ण आणि स्पष्ट मांडणी करा आणि यावरील मत मांडताना दोन्ही बाजू समजून घ्या.
3. आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करता?
हा प्रश्न तुमची कार्यपद्धती आणि शिस्त तपासण्यासाठी असतो. उत्तरीत तुम्ही सांगू शकता UPSC तयारीदरम्यान वेळ कसा विभागला, रिव्हिजन, अभ्यास आणि टेस्ट प्रॅक्टिस कशी संतुलित केली. तसेच, तुमचा व्यक्तिगत अनुभव, कारण पॅनलला खऱ्या अनुभवावर आधारित उत्तर आवडते.
4. तुमचे करिअर गोल्स काय आहेत?
येथे उत्तर स्पष्ट, कोणत्याही दुमताशिवाय आणि वास्तववादी असले पाहिजे. IAS झाल्यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात आणि कशा प्रकारे योगदान देऊ इच्छिता, हे ठामपणे सांगणे महत्त्वाचे आहे.
5. अलीकडे सरकारची कोणती पॉलिसी तुमच्या लक्षात आली आणि का?
अनेक उमेदवार या प्रश्नावर अडखळतात, कारण पॉलिसी वाचली असली तरी तिचा परिणाम, फायदे-तोटे आणि स्वतःची भूमिका तयार केलेली नसते. उत्तर देताना पॉलिसीचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू सांगा, संतुलित विश्लेषण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःची विचारसरणी जोडा.
इंटरव्ह्यूची तयारी करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी
करंट अफेअर्स सतत अपडेट ठेवा
सेल्फ-इंट्रोडक्शनची प्रॅक्टिस करा
उत्तरे छोटी, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण द्या
ओव्हर-स्मार्ट बनण्याचा प्रयत्न टाळा
पॉलिसीवर बोलताना तटस्थ आणि संतुलित दृष्टिकोन ठेवा