Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी!, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:28 PM2021-07-27T17:28:33+5:302021-07-27T17:29:04+5:30

Konkan Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध पदांवर भरतीची प्रक्रिया केली जात आहे.

Konkan Railway Recruitment 2021 Opportunity of job in Konkan Railway Selection through Direct Interview here is all details | Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी!, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...

Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी!, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...

googlenewsNext

Konkan Railway Recruitment 2021: रेल्वेतनोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध पदांवर भरतीची प्रक्रिया केली जात आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात येत आहे. या भरतीसाठीची मुलाखत प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. २९ जुलैपर्यंत मुलाखती घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर वेळ न दवडता मुलाखत देऊन संधीचं सोनं करुन घ्या. 

कोकणे रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं (केआरसीएल) रस्ता, सुरुंग आणि नवी रेल्वे लाइन निर्मिती संदर्भातील कामांसाठी भरती काढलेली आहे. याअंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर, एसटीए आणि जेटीएच्या पदांवर भरतीसाठीचं नोटिफिकेशन रेल्वेकडून जारी करण्यात आलं आहे. 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार प्रोजेक्ट इंजिनिअर १ पद, एसटीए पदासाठी ५ जागा आणि जेटीएसाठी १ जागेवर भरती केली जाणार आहे.

पात्रता काय?
कोकण रेल्वे भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या पात्रता निषकांनुसार प्रोजेक्ट इंजिनिअर आणि एसटीए पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (सिविल) किंवा समकक्ष पदवी असणं गरजेचं आहे. तर जेटीए पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. 

मुलाखत कुठे?
इच्छुक उमेदवारांना आपल्या सर्व कागदपत्रांसह २७ जुलै ते २९ जुलै दरम्यान केआर विहार, कोकण रेल्वे एक्झिक्युटिव्ह क्लब, सेक्टर ४०, सीवूड-पश्चिम, नवी मुंबई येथे होणाऱ्या मुलाखतीसाठी उपस्थित राहता येणार आहे. 

पगार किती?
कोकण रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया केरळ, नेपाळ आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आहेत. यात केरळमधील प्रकल्पासाठी प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी दरमहा ६५,६३७ रुपये वेतन मिळणार आहे. तर सिनिअर टेक्निकल असिस्टंटला दरमहा ५२,५३३ रुपये वेतन दिलं जाणार आहे. 

नेपाळमधील प्रोजेक्टसाठी सिनिअर टेक्निकल असिस्टंटला दरमहा ५२,५३३ रुपये आणि ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटला दरमहा ४१,४१८ रुपये वेतन दिलं जाणार आहे.

कोकण रेल्वेकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन तुम्ही https://konkanrailway.com/ वर भेट देऊन वाचू शकता.

Web Title: Konkan Railway Recruitment 2021 Opportunity of job in Konkan Railway Selection through Direct Interview here is all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.