सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, विविध पदांसाठी निघाली भरती, लवकर करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 02:35 PM2022-05-21T14:35:56+5:302022-05-21T14:38:55+5:30

CCI Recruitment 2022 : इच्छुक आणि पात्र उमेदवार सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in ला भेट देऊ शकतात आणि अर्जाशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात.

Job opportunities in Cement Corporation of India, Recruitment for various posts, Apply early | सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, विविध पदांसाठी निघाली भरती, लवकर करा अर्ज 

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, विविध पदांसाठी निघाली भरती, लवकर करा अर्ज 

googlenewsNext

नवी दिल्ली : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (CCI) भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अभियंता आणि अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जून निश्चित करण्यात आली आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवार सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in ला भेट देऊ शकतात आणि अर्जाशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात.

अधिसूचनेनुसार, 46 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये 27 रिक्त पदे अभियंता पदासाठी आहेत आणि 17 रिक्त जागा अधिकारी पदासाठी आहेत. चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदासाठी एक जागा रिक्त आहे.

अर्ज शुल्क 
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडीच्या उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार नाही.

शैक्षणिक पात्रता 
या भरती मोहिमेद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवारी अधिकृत अधिसूचना चेक करावी.

अशा प्रकारे करा अर्ज...
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in वर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा. यानंतर, फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रांसह मॅनेजर (एचआर), सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स क्रमांक: 3061, लोधी रोड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली : 110003  या पत्त्यावर पाठवा. 

Web Title: Job opportunities in Cement Corporation of India, Recruitment for various posts, Apply early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.