Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:14 PM2021-09-28T15:14:56+5:302021-09-28T15:15:46+5:30

SBI Bank Recruitment 2021:  एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in याची लिंक देण्यात आली आहे. तसेच खाली देखील आम्ही तुम्हाला थेट लिंक देणार आहोत. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे.

Job Alert: Job opportunities in State Bank; Start applying from today | Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

Next

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) भरती आय़ोजित केली आहे. वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस युनिटमध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांसह एकूण तीन जाहिराती जारी केल्या आहेत. यातून ६०६ जागांवर भरती केली जाणार आहे. (SBI Bank Recruitment 2021 for 606 sco posts.)

Bank Job Alert: TJSB Sahakari Bank मध्ये नोकरीची संधी; घाई करा, अर्ज करण्यासाठी मुदत कमी

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in याची लिंक देण्यात आली आहे. तसेच खाली देखील आम्ही तुम्हाला थेट लिंक देणार आहोत. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१ आहे. 

एसबीआयने मॅनेजमेंट बिझनेस युनिटमध्ये ज्या एससीओ पदांसाठी ५६७ जागांची घोषणा केली आहे. त्यामध्ये रिलेशनशीप मॅनेजर, रिलेशनशीप मॅनेजर (टीम लीड), कस्टमर रिलेशनशीप एग्जीक्यूटिव, इन्वेस्टमेंट ऑफिसर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड),सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)  ही पदे आहेत. इच्छुक उमेदवार CRPD/SCO-WEALTH/2021-22/17 या जाहिरात क्रमांकाची जाहिरात पाहू शकतात. अर्ज करताना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 

SBI Recruitment 2021: 38 SCO भरती
भारतीय स्टेट बँकेने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरसाठी मॅनेजर (मार्केटिंग) आणि डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) साठी एकूण ३८ जागांवर  भरती आयोजित केली आहे. यासाठीचा जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2021-22/15 हा आहे. 

SBI Recruitment 2021: 1 SCO भरती 
एसबीआयने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरसाठी एग्जीक्यूटिव (डॉक्यूमेंट प्रीजर्वेशन-आर्काइव्स) च्या एका पदासाठी तिसरी जाहिरात  प्रसिद्ध केली आहे. CRPD/SCO/2021-22/16 हा जाहिरात क्रमांक आहे. 

जाहिराती पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

Web Title: Job Alert: Job opportunities in State Bank; Start applying from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.