IBPS Clerk 2021: सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकता 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:13 AM2021-07-12T11:13:55+5:302021-07-12T11:16:03+5:30

IBPS Clerk Notification 2021 : या भरती अंतर्गत देशातील सर्व राज्यांतील विविध सरकारी बँकांमध्ये हजारो पदांवर लिपिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. द

ibps clerk notification 2021 released bank clerk job vacancies online registration ibps in direct link | IBPS Clerk 2021: सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकता 

IBPS Clerk 2021: सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकता 

googlenewsNext
ठळक मुद्देया पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करू शकतात.बँकेत नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.

IBPS Clerk Notification 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शनने (आयबीपीएस) बँकांमध्ये लिपिक (क्लर्क) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी केली आहे. या भरती अंतर्गत देशातील सर्व राज्यांतील विविध सरकारी बँकांमध्ये हजारो पदांवर लिपिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि अन्य बँकांमध्ये या भरती अंतर्गत लिपिकांच्या पदांसाठी नियुक्ती करण्यात येईल. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करू शकतात.

आयबीपीएस लिपिक भरती अंतर्गत बँकेत नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील भरती परीक्षेस येऊ शकतात.या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स परीक्षा द्यावी लागेल. जे उमेदवार प्रिलिम्स परिक्षेत यश मिळवतील, त्यांना आयबीपीएस लिपिक मेन्समध्ये हजर राहावे लागेल. ज्यांना परीक्षेत यश मिळेल, त्यांना नोकरी दिली जाईल.

IBPS Calendar 2021: महत्त्वाच्या तारखा...
ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख - 12 जुलै 2021 
ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख - 01 ऑगस्ट 2021 
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2021

ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये परीक्षा
आयबीपीएस परीक्षा दिनदर्शिका 2021 (IBPS Exam Calendar) नुसार लिपिक भरती परीक्षा 2021 ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल. आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2021 (IBPS Clerk Prelims) 28 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल. यानंतर, 31 ऑक्टोबर 2021 रोजी लिपिक मेन्सची परीक्षा घेण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करावा लागेल
यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आयबीपीएस वेबसाइटच्या होमपेजवरील CRP Clerk XI या लिंकवर क्लिक करा. सर्वात आधी New Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचे डिटेल्स भरावे लागतील. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून उमेदवार IBPS Clerk 2021 साठी अर्ज करू शकतात.

Web Title: ibps clerk notification 2021 released bank clerk job vacancies online registration ibps in direct link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.