इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय - बुद्धिमत्ता चाचणी, वर्गीकरण - शब्दसंग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:22 AM2019-01-14T10:22:05+5:302019-01-14T10:30:09+5:30

बुद्धिमत्ता चाचणी - वर्गीकरण - शब्दसंग्रह या प्रश्नप्रकारात साम्य असणारे चार घटक दिलेले असतात. त्यापैकी तीन घटकात समान गुणधर्म असतो. ते ओळखून विसंगत किंवा वेगळा घटक शोधावा लागतो.

Etc. 5th Scholarship Examination -: Subject - Intelligence Test, Classification - Vocabulary | इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय - बुद्धिमत्ता चाचणी, वर्गीकरण - शब्दसंग्रह

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय - बुद्धिमत्ता चाचणी, वर्गीकरण - शब्दसंग्रह

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा- लेख क्रमांक १३ विषय - बुद्धिमत्ता चाचणीघटक - वर्गीकरण - शब्दसंग्रह

लेख क्रमांक १३ विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - वर्गीकरण - शब्दसंग्रह

महत्त्वाचे मुद्दे -

१) या प्रश्नप्रकारात साम्य असणारे चार घटक दिलेले असतात. त्यापैकी तीन घटकात समान गुणधर्म असतो. ते ओळखून विसंगत किंवा वेगळा घटक शोधावा लागतो.

२) यात सामान्यज्ञान माहिती असणे गरजेचे आहे.

३) भाषा, सामान्यज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल किंवा परिसर अभ्यास, वर्तमानपत्र व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचावेत.

सोडविलेले प्रश्न -

गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • १) बटाटे २) मुळा ३) गाजर ४) रताळे (२०१७)

स्पष्टीकरण - पर्याय क्र. १ बरोबर असेल, कारण बटाटा हे खोड आहे. बाकीची मूळ आहेत.

  • १) विधू २) अर्क ३) भानू ४) मित्र (२०१७)

स्पष्टीकरण - अर्क, भानू व मित्र हे सूर्यासाठी समानार्थी शब्द आहेत. विधू म्हणजे चंद्र म्हणून पर्याय क्र. १ वेगळा असेल.

  • १) गुजराती २) अहिराणी ३) तामिळ ४) कन्नड

स्पष्टीकरण - यातील गुजराती, तामिळ, कन्नड या प्रादेशिक राज्यभाषा आहेत, तर अहिराणी ही महाष्ट्रातील बोलिभाषा आहे.

  • १) पादप २) तरु ३) रुक्ष ४) द्रुम

स्पष्टीकरण - पादप, तरु, द्रुम म्हणजे झाड रुक्ष हा वेगळा शब्द येईल.

  • १) मेथी २) चाकवत ३) पालक ४) फुलकोबी

स्पष्टीकरण - फुलकोबी म्हणजे फ्लॉवर ही फुलभाजी आहे. मेथी, चाकवत, पालक, पालेभाजी आहेत.

नमुना प्रश्न

- गटातील वेगळे पद निवडा.

  • १) वैशाख २) ज्येष्ठ ३) आषाढ ४) कार्तिक

 

  • १) खीर २) बासुंदी ३) शिरा ४) मिसळ
  • १) नलद २) वरद ३) नीरद ४) अंबुद
  • १) चिमणी २) झुरळ ३) फुलपाखरु ४) मुंगी
  • १) एक आॅगस्ट २) दोन आॅक्टोबर ३) चौदा नोव्हेंबर ४) चौदा एप्रिल
  • १) जांभूळ २) पेरु ३) बोर ४) आवळा
  • १) मोगरा २) चाफा ३) तगर ४) निशिगंध
  • १) मस्जिद २) मंदिर ३) तीर्थंकर ४) विहार
  • १) सप्टेंबर २) एप्रिल ३) जून ४) आॅक्टोबर
  • १) खेकडा २) कासव ३) मासा ४) बेडूक
  • १) विराट कोहली २) पी. व्ही. सिंधू ३) धोनी ४) सचिन तेंडूलकर
  • १) हृदय २) मेंदू ३) यकृत ४) हात
  • १) कान २) हात ३) नाक ४) पाय
  • १) कृष्णा २) गोदावरी ३) तापी ४) भीमा
  • १) सुरसनीरस २) कोडकौतुक ३) न्यायनिवाडा ४) नवाकोश


उत्तरसूची - १) ४  २) ३  ३) २  ४) १  ५) १  ६) २  ७) २  ८) ३  ९) ४  १०) ३  ११) २  १२) ४  १३) ३  १४) ३  १५) १

 

संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th Scholarship Examination -: Subject - Intelligence Test, Classification - Vocabulary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.