lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zomato कडून Grocery डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे कारण?

Zomato कडून Grocery डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे कारण?

Zomato : झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे किराणा पायलट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारची किराणा डिलिव्हरी चालवण्याची कोणतीही योजना नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:08 PM2021-09-12T17:08:34+5:302021-09-12T17:09:30+5:30

Zomato : झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे किराणा पायलट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारची किराणा डिलिव्हरी चालवण्याची कोणतीही योजना नाही.

zomato has decided to discontinue the grocery delivery service know what is the reason | Zomato कडून Grocery डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे कारण?

Zomato कडून Grocery डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे कारण?

नवी दिल्ली : ऑनलाईन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटो (Zomato) आता किराणा (Grocery)डिलिव्हरी सेवेतून बाहेर पडली आहे. आता तुम्हाला झोमॅटोच्या अॅपवर ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस (Grocery Delivery Service) मिळणार नाही. फूड टेक प्लॅटफॉर्मने ऑर्डर पूर्ण करण्यात अंतर, ग्राहकांचा कमी मिळालेला प्रतिसाद आणि प्रतिस्पर्ध्यांकडून वाढती स्पर्धा या कारणामुळे आपली नुकतीच सुरू केलेली ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 15 मिनिटांत एक्सप्रेस डिलिव्हरीचे आश्वासन देत होती.

कंपनीने म्हटले आहे की,  ग्रॉफर्समधील (Grofers) त्यांच्या गुंतवणुकीमुळे इन-हाउस ग्रॉसरी प्रयत्नांच्या तुलनेत चांगले परिणाम मिळतील. मनीकंट्रोलजवळ झोमॅटोने त्याच्या ग्रॉसरी पार्टनर्सना पाठवलेल्या मेलची प्रत आहे. झोमॅटोच्या प्रवक्त्याने मनीकंट्रोलकडे ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस बंद केल्याची पुष्टी केली आहे.

झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे किराणा पायलट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारची किराणा डिलिव्हरी चालवण्याची कोणतीही योजना नाही. कंपनीने अलीकडेच ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्म ग्रोफर्समध्ये 10 कोटी डॉलर (745 कोटी रुपये) गुंतवणूकीसह काही हिस्सेदारी खरेदी केली होती.

कंपनीचे सीएफओ अक्षत गोयल म्हणाले होते की, झोमॅटोने या नवीन क्षेत्रात अधिक अनुभव मिळवण्याच्या उद्देशाने आणि व्यवसायासाठी नियोजन आणि धोरण आखण्याच्या उद्देशाने ग्रॉफर्समध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. आम्ही लवकरच झोमॅटो अॅपवर किराणा मालाची ऑनलाईन विक्री करण्याची सेवा सुरू करू आणि यासह आम्ही या क्षेत्रात पाऊल टाकू. तसेच, आम्ही किती वेगाने पुढे जातो ते पाहू, असेही क्षत गोयल म्हणाले होते.

17 सप्टेंबरपासून पायलट ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस बंद
झोमॅटोने 11 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या ग्रॉसरी पार्टनर्सना पाठविलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की, 17 सप्टेंबरपासून पायलट ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने निवडक बाजारांमध्ये किराणा सेवा पायलट सुरू केली होती. याअंतर्गत, ग्राहकांना 45 मिनिटांच्या आत किराणा डिलिव्हरी करण्यात येत होती.

Web Title: zomato has decided to discontinue the grocery delivery service know what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.