Lokmat Money > बिझनेस न्यूज > भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

धीरुभाईंचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे, धीरुभाईंच्या यशाने हे सिद्ध झाले की, यशस्वी उद्योगपती होण्यासाठी फक्त मोठमोठ्या डिग्री घेण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:28 AM2020-07-06T11:28:42+5:302020-07-06T12:05:42+5:30

धीरुभाईंचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे, धीरुभाईंच्या यशाने हे सिद्ध झाले की, यशस्वी उद्योगपती होण्यासाठी फक्त मोठमोठ्या डिग्री घेण्याची गरज नाही.

The young man who sold bhaji became famous all over the world; Read Dhirubhai Ambani success story | भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

मुंबई – गुजरातच्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या धीरुभाई अंबानी यांच्या स्वप्नातून साकारलेली रिलायन्स इंडस्ट्रीज फक्त भारतातच नाही तर जगातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. धीरुभाईंच्या या यशस्वी संघर्षगाथेने देश आणि जगातील कोट्यवधी लोक प्रेरित आहेत. आज ६ जुलै रोजी धीरुभाई अंबानी यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने धीरुभाईंच्या आयुष्यातील काही क्षण जाणून घेऊयात.

धीरुभाईचं पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी, २८ डिसेंबर १९३२ साली गुजरातच्या जुनागढ शहरातील चोरवाड येथील वैश्य घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शाळेतील शिक्षक होते.

सुरुवातीच्या काळात धीरुभाईंनी गिरनार येथे येणाऱ्या पर्यटकांना भजी विकण्याचं काम सुरु केले.

धीरुभाईंचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे, धीरुभाईंच्या यशाने हे सिद्ध झाले की, यशस्वी उद्योगपती होण्यासाठी फक्त मोठमोठ्या डिग्री घेण्याची गरज नाही.

फक्त १६ व्या वर्षी त्यांनी १९५५ मध्ये पहिल्यांदा परदेश दौरा केला. ते भाऊ रमणिकलाल यांच्यासोबत काम करण्यासाठी यमनच्या अदन शहरात पोहचले.

अदन याठिकाणी एका पेट्रोल पंपावर सहाय्यक म्हणून धीरुभाईंनी पहिली नोकरी केली. त्याठिकाणी महिन्याला ३०० रुपये पगार मिळत असे.

काही काळानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि गिरनार डोंगर परिसरात पर्यटकांना भजी विकण्याचा व्यवसाय सुरु केला.

५ वर्षानंतर त्यांनी नातेवाईक चंपकलाल दमानी यांच्यासोबत मिळून १९६० मध्ये रिलायन्स कर्मिशियल कॉरर्पोरेशनची स्थापना केली.

धीरुभाईंचे पहिलं कार्यालय मुंबईतील मस्जिद बंद परिसरात नरसीनाथन स्ट्रीट येथे ३५० स्क्वेअर फूट रुममध्ये होतं. याठिकाणी २ मेज, ३ चेअर आणि १ टेलिफोन होता.

केवळ 50 हजार रुपये भांडवल आणि दोन सहाय्यकांच्या त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. आज फक्त मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजची बाजारपेठ ११ लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

त्याच्या कंपनीचे नाव बर्‍याच वेळा बदलले. यापूर्वी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन असे नामकरण करण्यात आले जे बदलून रिलायन्स टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड व शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले.

धीरूभाईंनी नायलॉनची आयात सुरू केली, ज्यामुळे त्यांना सुमारे ३०० टक्के नफा मिळाला.

१९९६ मध्ये रिलायन्स भारतातील अशी पहिली खासगी कंपनी बनली ज्याला एस अँड पी, मूडीज या आंतरराष्ट्रीय पत रेटिंग संस्थांकडून रेटिंग सुरू करण्यात आली.

त्यांच्या नेतृत्वात रिलायन्स ही वार्षिक महासभा (एजीएम) स्टेडियम असलेली पहिली खासगी कंपनी ठरली. १९८६ च्या अशाच एका एजीएममध्ये साडेतीन लाख लोकांनी भाग घेतला. यानंतर त्यांनी आपला व्यवसाय पेट्रोकेमिकल, टेलिकॉम, एनर्जी, पॉवर अशा अनेक क्षेत्रात विस्तारित केला.

धीरुभाईंना दोनदा ब्रेनस्ट्रोक आला. १९८६ मध्ये प्रथमच आणि २४ जून २००२ रोजी दुसरी वेळ. ६ जुलै २००२ रोजी त्यांचे निधन झाले.

हिंदी चित्रपट 'गुरु' धीरूभाई अंबानी यांच्या जीवनातून प्रेरित झाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश

कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी

रुग्णालयाची धक्कादायक ऑफर; २५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल

हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र

Web Title: The young man who sold bhaji became famous all over the world; Read Dhirubhai Ambani success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.