Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७६९ रुपयांचा सिलेंडर मिळतोय केवळ ६९ रुपयांना, असा घेता येईल ऑफरचा लाभ

७६९ रुपयांचा सिलेंडर मिळतोय केवळ ६९ रुपयांना, असा घेता येईल ऑफरचा लाभ

LPG cylinder of Rs 769 for only Rs 69 : आता ७६९ रुपयांना मिळणारा सिलेंडर तुम्ही केवळ ६९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. जाणून घ्या सिलेंडर खरेदीबाबतच्या या खास ऑफरचा लाभ कसा घेता येईल त्याबाबत.

By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 10:14 AM2021-02-18T10:14:53+5:302021-02-18T10:24:08+5:30

LPG cylinder of Rs 769 for only Rs 69 : आता ७६९ रुपयांना मिळणारा सिलेंडर तुम्ही केवळ ६९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. जाणून घ्या सिलेंडर खरेदीबाबतच्या या खास ऑफरचा लाभ कसा घेता येईल त्याबाबत.

You can get the benefit of the offer by getting a LPG cylinder of Rs 769 for only Rs 69 through Paytm app | ७६९ रुपयांचा सिलेंडर मिळतोय केवळ ६९ रुपयांना, असा घेता येईल ऑफरचा लाभ

७६९ रुपयांचा सिलेंडर मिळतोय केवळ ६९ रुपयांना, असा घेता येईल ऑफरचा लाभ

Highlights७६९ रुपयांचा सिलेंडर ६९ रुपयात मिळवण्याचा ऑफरचा लाभ तुम्ही पेटीएमवरून एलपीजी सिलेंडर बुक केल्यास मिळवू शकालपेटीएमवरून (Paytm) एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तुम्हाला ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता हा कॅशबॅक पेटीएम अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर  बुक करणाऱ्या ग्राहांना मिळणार आहे

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत LPG Gas Cylinder चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरचे बजेट बिघडले आहे. हल्लीच सरकारने एलपीजीच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्याने विनाअनुदानित १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून ७६९ रुपये झाली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा विनाअनुदानित सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पहिल्यांदा २५ रुपये आणि नंतर ५० रुपयांनी दर वाढले आहेत. मात्र आता ७६९ रुपयांना मिळणारा सिलेंडर तुम्ही केवळ ६९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. जाणून घ्या सिलेंडर खरेदीबाबतच्या या खास ऑफरचा लाभ कसा घेता येईल त्याबाबत. ( Get the benefit of the offer by getting a LPG cylinder of Rs 769 for only Rs 69 through Paytm app )
 
७६९ रुपयांचा सिलेंडर ६९ रुपयात मिळवण्याचा ऑफरचा लाभ तुम्ही पेटीएमवरून एलपीजी सिलेंडर बुक केल्यास मिळवू शकाल. तुम्ही पेटीएमवरून (Paytm) एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तुम्हाला ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. देशातील बहुतांश भाहात एलपीजी सिलेंडर हा सब्सिडीनंतर ७०० ते ७६९ रुपयांपर्यंत मिळत असताना तुम्ही पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा उठवून तो केवळी ६९ रुपयांत खरेदी करू शकता.  
 


असा घेता येईल ऑपरचा लाभ  

- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्या फोनमध्ये पेटीएम अॅप नसल्यास ते अॅप डाऊनलोड करून घ्या. 
- त्यानंतर फोनमध्ये हे अॅप ओपन करा
- त्यानंतर recharge and pay bills या पर्यायावर जा
- आता book a cylinder हा पर्याय निवडा
- त्यातून तुमच्या गॅस पुरवठादार कंपनीचा पर्याय निवडा
- त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा आपल्या एलपीजी आयडीची नोंद करा 
- त्यानंतर तुमचा पेमेंट ऑप्शन दिसेल 
- आता पेमेंट करण्यापूर्वी पहिल्या ऑफरवर 'FIRSTLPG' हा प्रोमो कोट टाका 

७०० रुपयांपर्यंतची ही कॅशबॅक ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वैध आहे. हा कॅशबॅक पेटीएम अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर  बुक करणाऱ्या ग्राहांना मिळणार आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपन्यांसोबत करार केला आहे. 

Web Title: You can get the benefit of the offer by getting a LPG cylinder of Rs 769 for only Rs 69 through Paytm app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.