Lokmat Money > बिझनेस न्यूज > लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:19 PM2020-06-23T12:19:52+5:302020-06-23T12:30:52+5:30

अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.

work from home allowances have to pay more income tax personnel finance | लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मोठमोठ्या कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पगार कपात तर काही ठिकाणी कामगारांची कपात करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र आता काही लोकांना कोरोनाच्या संकटकाळात वर्क फ्रॉम होम महागात पडू शकतं. त्यांना यामुळे जास्तीचा इनकम टॅक्स भरवा लागणार आहे. 

खासगी क्षेत्रामध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा पगार 'कॉस्ट टू कंपनी' (CTC) या प्रणालीअंतर्गत ठरवला जातो. यामध्ये अनेक कंपन्यांमध्ये पगाराचा हिस्सा 'A' आणि 'B' या दोन सेक्शनमध्ये विभागला जातो. ए पार्टमध्ये बेसिक सॅलरी, डीए आणि एचआरए असतात. तर बी भागामध्ये ट्रान्सपोर्ट अलाऊन्स, एंटरटेनमेंट अलाऊन्स असतो. कर्मचारी यासाठी खर्च केलेल्या रकमेचं बिल कंपनीकडे देतात आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. यावर कर आकारला जात नाही. काही ठिकाणी हे रिम्बर्समेंटच्या रुपात दिले जातात.

लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे कुटुंबियांसोबत बाहेरचं जेवण देखील ते करत नाहीत परिणामी त्यांना मिळणारा प्रवास भत्ता आणि मनोरंजन भत्ता आता टॅक्सेबल होत आहे. म्हणजेच यावर त्यांना कर द्यावा लागेल. सामान्यत: विशेष सूट मिळाल्यानंतर या भत्त्यांवर कर आकारला जात नाही. जर अलाऊन्स खर्च केले गेले नाही तर त्यावर टॅक्स लागतो. हा कर त्याच दराने आकारला जाईल, ज्या टॅक्स स्लॅबमध्ये कर्मचारी येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव 

Web Title: work from home allowances have to pay more income tax personnel finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.