Lokmat Money > बिझनेस न्यूज > विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य

विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य

भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अझीम प्रेमजी आज निवृत्त होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 10:14 AM2019-07-30T10:14:49+5:302019-07-30T10:15:01+5:30

भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अझीम प्रेमजी आज निवृत्त होत आहेत.

wipro chairman azim premji retire today india know his secrets of becoming rich | विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य

विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य

नवी दिल्लीः भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अझीम प्रेमजी आज निवृत्त होत आहेत. विप्रोच्या अध्यक्षपदाचा ते राजीनामा देणार असून, त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी आता कंपनीची धुरा सांभाळणार आहे. अझीम प्रेमजी यांचा जन्म मुंबईतल्या एका गुजराती मुस्लिम कुटुंबात 24 जुलै 1945मध्ये झाला. अझीम प्रेमजींचे कुटुंबीय मूळचे खान्देशातील अमळनेरचे आहेत. तिथे त्यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस् या नावाने सनफ्लॉवर खाद्यतेलाचा कारखाना टाकला होता व 787 या नावाच्या कपडे धुण्याच्या साबणाचाही ते उद्योग करत होते.

1966 साली अझीम प्रेमजी अमेरिकेत स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकत असतानाच त्यांना वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली व शिक्षण अर्धवट सोडून ते भारतात परतले. त्यावेळी ते 21 वर्षांचे होते. प्रॉडक्टस्, पारंपरिक साबण, बेबी केअर प्रॉडक्टस्, सौंदर्य प्रसाधने यांची भर घालून व्यवसाय विस्तार केला. 1980 साली संगणक युग येणार अशी चर्चा सुरू झाली, त्यावेळी अझीम प्रेमजी यांनी कॉम्प्युटरचे महत्त्व अचूक दूरदृष्टीने हेरले व त्या व्यवसायात प्रवेश करायचे ठरवले. त्याचवेळी आयबीएम ही बलाढ्य संगणक कंपनी भारत सोडून अमेरिकेत गेली होती. त्याचा फायदा उठवत अझीम प्रेमजींनी ‘विप्रो’ डेस्कटॉप कॉम्प्युटर्स भारतात सादर केले. लवकरच त्यांनी अमेरिकेच्या सेंटनिल कॉम्प्युटर कॉर्पोरेशनबरोबर करार केला व उन्नत प्रकारचे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरही बनवायला सुरुवात केली. आज विप्रो ही जगातली बलाढ्य कॉम्प्युटर कंपनी म्हणून ओळखली जाते.


साबण ते सॉफ्टवेअर किंग अशी ही अझीम प्रेमजींची यशोगाथा आहे. अझीम प्रेमजींचा विवाह यास्मीन यांच्याशी झाला असून, त्यांना रिषद व तारीक ही दोन मुले आहेत. रिषद सध्या विप्रोच्या माहिती-तंत्रज्ञान विभागात चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर म्हणून काम करतो. अझीम प्रेमजी यांच्या या कामगिरीसाठी त्यांना बिझनेस वीकने ग्रेटेस्ट एंटरप्रेन्युअर हा पुरस्कार दिला आहे, तर 2000 साली मणिपाल विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगने त्यांना लक्ष्य बिझनेस व्हिजनरी तर कनेक्टिकट विद्यापीठ व म्हैसूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिल्या आहेत. भारत सरकारने त्यांना 2005मध्ये पद्मभूषण व 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 

Web Title: wipro chairman azim premji retire today india know his secrets of becoming rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.