Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या तेलाचे दर येतील प्रति बॅरल ५ डॉलरपर्यंत?  

कच्च्या तेलाचे दर येतील प्रति बॅरल ५ डॉलरपर्यंत?  

सध्या कच्च्या तेलाच्या किमती ६० टक्क्यांनी घसरून २००३ नंतरच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:00 AM2020-03-21T05:00:10+5:302020-03-21T05:01:02+5:30

सध्या कच्च्या तेलाच्या किमती ६० टक्क्यांनी घसरून २००३ नंतरच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत.

Will crude oil prices go up to $ 5 per barrel? | कच्च्या तेलाचे दर येतील प्रति बॅरल ५ डॉलरपर्यंत?  

कच्च्या तेलाचे दर येतील प्रति बॅरल ५ डॉलरपर्यंत?  

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरून ५ डॉलर प्रति बॅरल होऊ शकतात, असा इशारा विश्लेषक संस्थांनी दिला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ६० टक्क्यांनी घसरून २००३ नंतरच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाचे दर आणखी घसरून २० डॉलर प्रति बॅरल होतील, असेही विश्लेषकांना वाटते.

गोल्डमॅन सॅश समूहापासून सिटी ग्रुप आयएनसीपर्यंत अनेक संस्थांच्या विश्लेषकांनी कच्च्या तेलाच्या दरात तीव्र घसरण होणार असल्याचे म्हटले आहे. आधीच अतिरिक्त उत्पादन असताना कोविद-१९ विषाणूने जगभर थैमान घातल्याने तेलाची मागणी कमालीची घटली आहे. त्यामुळे किमती सातत्याने घसरत असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडचे दर १३ टक्क्यांनी घसरून २४.८८ डॉलर प्रति बॅरल झाले होते. मे २००३ नंतरचा हा नीचांक ठरला होता.

Web Title: Will crude oil prices go up to $ 5 per barrel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.