Lokmat Money > बिझनेस न्यूज > लवचिक कालावधी गुंतवणूक

लवचिक कालावधी गुंतवणूक

भारत बॉण्ड ETF  यांची लवचिक कालावधी गुंतवणूक योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:26 PM2019-12-17T17:26:51+5:302019-12-17T17:27:32+5:30

भारत बॉण्ड ETF  यांची लवचिक कालावधी गुंतवणूक योजना आहे.

What is a BHARAT Bond ETF, why to invest in this bond? | लवचिक कालावधी गुंतवणूक

लवचिक कालावधी गुंतवणूक

ज्या गुंतवणूकदारांना कधी कुठे कशी गुंतवणूक करायची याचे ज्ञान नसते. त्यांच्यासाठी गुंतवणूक करणे फार सोपे आहे. पण सामान्य माणसासाठी गुंतवणूक हा खूप गुंतागुंतीचा आणि गहन  प्रश्न आहे. ज्यांना गुंतवणुकीचे ज्ञान माहीत आहे. कोणत्या माध्यमातून त्यांचच गुंतवणुकीचा योग्य वापर करून फायदा मिळवू शकतात पण दुर्दैवाने खूप साऱ्या लोकांना गुंतवणूक जगताची पुरेशी माहिती नसते त्यामुळे बरेचदा ते गुंतवणूक करतच नाही किंवा चुकीच्या गुंतवणूक योजनांचा वापर करून स्वतःचे नुकसान करून घेतात.

सामान्य गुंतवणूकदारांकडून होणारी सर्वसामान्य चूक म्हणजे ठराविक कालावधीसाठी पैश्याची केलेली गुंतवणूक. अशी गुंतवणूक करून स्वतःच्या स्वातंत्र्याला मर्यादा आणतात. अगदी वाईट परिस्थितीतही पैश्यांची गरज असताना आपण ते पैसे काढू शकत नाही अशावेळी सामान्य गुंतवणूकदार वैतागतात म्हणून कुठल्याही कालावधीची मर्यादा नसणाऱ्या योजेनेमध्ये पैसे गुंतवणे हि उत्तम कल्पना आहे. 

लवचिक कालावधी गुंतवणूक - संपूर्ण स्वातंत्र

भारतातील पहिला कार्पोरेट बॉण्ड ETF म्हणजे भारत बॉण्ड. ज्यामध्ये लवचिक कालावधी गुंतवणूक करू शकतो. ज्यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढून घेण्याचे स्वातंत्र मिळते. या सुविधेमुळे कार्पोरेट कंपनीचे भारतीयांनी स्वागत केले. 

भारत बॉण्ड ETF  यांची लवचिक कालावधी गुंतवणूक योजना आहे. ETF  म्हणजे एक्सचेंज ट्रेड फंड जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधले अग्रगण्य नाव आहे. भारत बॉण्डकडे मार्केट मेकर्स आहेत जे गरजेप्रमाणे गुंतवणूकदारांना दरपत्रक आणि पैश्यांची तरलता उपलब्ध करून देऊ शकतात. 

अधिकतम फायदा -
भारत बॉण्ड ETF  इथे तुमचा योग्य पद्धतीने पैसा गुंतवला जाऊन त्याचा योग्य परतावा तुम्हाला मिळणार आहे. 
हा भारत सरकारचा सर्वात पहिला उपक्रम असून भारत बाँड ETF  चे उद्दिष्ट्ये हे सार्वजनिक क्षेत्रात तुमचा पैसा गुंतविला जाईल त्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

१- अधिकतम सुरक्षा -

उत्कृष्ट दर्जाच्या कंपन्यांमध्ये तुमचा पैसा गुंतवला जाईल. त्यातील आरईसी लिमिटेड, भारताचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या काही विश्वासार्ह कंपन्या आहेत.

२ - कमी व्याजदर -
तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे भारतातील सर्वाधिक कमी व्याजदर आकारणारे म्युच्युअल फंड प्रोडक्ट आहे. यासाठी फंड मॅनेजर फक्त 0.0005 % इतके दर आकारतो. 
उदा. जर गुंतवणूकदराने २ लाख रुपये इतकी गुंतवणूक केली असेल तर त्यासाठी गुंतवणूकदारास फक्त १ रुपया दर द्यावा लागेल. 

३ - पारदर्शकता – 
गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची रोज माहिती देण्यात येईल. 

४ - टॅक्स सेविंग (कर वाचवणे आणि कर बचत)- 
ETF च्या गुंतवणुकीमुळे कारबचतीचा फायदा तुम्हाला मिळेल. तुमची गुंतवणूक जर ३ वर्षाहून अधिक कालावधीसाठी असेल तर त्यावर तुमची २० % कर बचत होऊ शकते.

५ - स्थिर परतावा – 
ETF  हि एक ठराविक योजना असून (३ वर्षांसाठी व १० वर्षांच्या गुंतवणूकदारांसाठी ) स्थिर परतावा फंड माँटुरिटी वेळी गुंतवणूकदारास दिला जाईल. 

अशा अनेक वैशिष्टये आणि फायद्यांसहित भारत बॉण्ड ETF  हे तुमच्या गुंतवणुकीस सुरक्षितता व विश्वासार्हता प्राप्त करून देते आणि गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग यांचा पाठिंबा असून कमी धोका आणि चांगल्या मोबदल्याच्या स्वरूपात असल्याने जागतिक पातळीवर लोकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

२० डिसेंबर २०१९ हि भारत बॉण्ड ETF  मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख असून अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा
 

Web Title: What is a BHARAT Bond ETF, why to invest in this bond?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.