इन्फोसिसला मोठा फटका; २ लाख कोटींचा झटका, टॉप १० कंपन्यांच्या यादीतून बाहेर
दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिससाठी २०२६ हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे मार्केट कॅप २ लाख कोटी रुपयांनी घटलं.
यामुळे बाजार भांडवलाच्या बाबतीत इन्फोसिस देशातील पहिल्या १० कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे.
इन्फोसिसच्या शेअर्समध्ये आज बुधवारी २ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली, ज्यामुळे हा स्टॉक ११७८ रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला आहे.
सध्या इन्फोसिसचे मार्केट कॅप ४.७६ लाख कोटी रुपये असून ती देशातील ११ वी सर्वात मूल्यवान कंपनी आहे.
सध्या इन्फोसिसचे मार्केट कॅप ४.७६ लाख कोटी रुपये असून ती देशातील ११ वी सर्वात मूल्यवान कंपनी आहे. २०२५ च्या अखेरीस इन्फोसिसचे मार्केट कॅप ६.८ लाख कोटी रुपये इतके होते.
दुसरीकडे, सरकारी विमा कंपनी एलआयसी शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांमध्ये आपली जागा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.