निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळवण्यासाठी कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी?
EPF- नोकरवर्गासाठी सुरक्षित योजना. यात 8.25% व्याजदर असून, रिटायरमेंटला यातून मोठी एकरकमी रक्कम मिळते.
PPF- सरकारची टॅक्स-फ्री योजना आहे. 7.1% व्याजदरासह किमान ₹500 ते कमाल ₹1.5 लाख गुंतवणूक करू शकता.
NPS- सर्वाधिक परतावा देणारी मार्केट-लिंक्ड योजना असून, यात सरासरी 9-11% परतावा मिळतो. ही योजनादेखील करमुक्त आहे.
25-35 वयोगटातील तरुणांनी NPS निवडावी. 35-45+ वयोगटातील लोकांनी EPF+PPF+NPS चे मिश्रण करावे.
गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या. आपली आर्थिक स्थिती, क्षमता आणि आवडीनुसार, गुंतवणूक करावी.