Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवृत्तीनंतरही दरमहा उत्पन्न हवे? 'या' योजना ठरतील फायदेशीर

निवृत्तीनंतरही दरमहा उत्पन्न हवे? 'या' योजना ठरतील फायदेशीर

गुंतवणुकीचे असे काही मार्ग आहेत ज्यातून निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक उत्पन्न मिळू शकते. जाणून घेऊ त्यासंदर्भात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:23 PM2021-11-22T12:23:24+5:302021-11-22T12:24:19+5:30

गुंतवणुकीचे असे काही मार्ग आहेत ज्यातून निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक उत्पन्न मिळू शकते. जाणून घेऊ त्यासंदर्भात...

Want a monthly income even after retirement? These schemes will be beneficial | निवृत्तीनंतरही दरमहा उत्पन्न हवे? 'या' योजना ठरतील फायदेशीर

निवृत्तीनंतरही दरमहा उत्पन्न हवे? 'या' योजना ठरतील फायदेशीर

निवृत्तीनंतरही आपल्याला दरमहा ठरावीक उत्पन्न मिळावे, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी निवृत्तपूर्व वर्षात आर्थिक नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. गुंतवणुकीचे असे काही मार्ग आहेत ज्यातून निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक उत्पन्न मिळू शकते. जाणून घेऊ त्यासंदर्भात...

पोस्टाची मासिक उत्पन्न योजना!
- पोस्टाची ही एक लोकप्रिय योजना आहे. 
- या योजनेमध्ये एकरकमी वा मासिक गुंतवणूक करता येते. 
- ही योजना ५ वर्षांची आहे. 
- मात्र, त्यातही पाच वर्षांची वाढ करता येऊ शकते.

सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन
- पैशांची नियमित आवक ठेवायची असेल तर सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) 
योजना उपयुक्त आहे. 
- एसडब्ल्यूपीच्या 
माध्यमातून म्युच्युअल 
फंड स्कीमचे युनिट्स विभाजित करता येतात.
- एसडब्ल्यूपीमधून 
गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेत गुंतवलेल्या रकमेतून ठरावीक रक्कम काढू शकतो. 
- त्यात दररोज, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. 
- त्यावर इक्विटी आणि डेट फंडांवर लागू असलेल्या कराप्रमाणे करआकारणी केली जाते.  

स्टेट बँकेतील गुंतवणुकीचा पर्याय
- स्टेट बँकेची ॲन्युईटी डिपॉझिट स्कीम हाही एक चांगला पर्याय आहे. 
- यात एकरकमी गुंतवणूक करून दरमहा व्याजाबरोबरच ईएमआयच्या रुपाने गॅरेंटेड इन्कम प्राप्त होऊ शकते.
- या योजनेनुसार कस्टमरला दरमहा प्रिन्सिपल अमाऊंटबरोबरच व्याज दिले जाते. 
- हे व्याज अकाऊंटवर शिल्लक असलेल्या रकमेवर दर तिमाहीने कम्पाऊंडिंगवर कॅलक्युलेट केले जाते. 
- या योजनेत तीन, पाच, सात वा दहा वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीची किमान रक्कम २५ हजार रुपये आहे. 
 

Web Title: Want a monthly income even after retirement? These schemes will be beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.