lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘कोर्ट निकालाचा राज्यातील सहकारावर परिणाम नाही’

‘कोर्ट निकालाचा राज्यातील सहकारावर परिणाम नाही’

सन २०११ मध्ये केंद्र सरकारने केलेली ९७ वी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:39 AM2021-07-21T10:39:13+5:302021-07-21T10:41:11+5:30

सन २०११ मध्ये केंद्र सरकारने केलेली ९७ वी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे.

vidyadhar anaskar says court ruling does not affect state co operation | ‘कोर्ट निकालाचा राज्यातील सहकारावर परिणाम नाही’

‘कोर्ट निकालाचा राज्यातील सहकारावर परिणाम नाही’

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे :सर्वोच्च न्यायालयाने ९७ वी घटना दुरुस्ती रद्द ठरवित केंद्राच्या सहकार मंत्रालयावर नियंत्रण आणले आहे. या निकालामुळे राज्यांचे सहकार खात्याबाबतचे अधिकार अबाधित राहणार असून, त्याचा महाराष्ट्राच्या सहकार धोरणावर परिणाम होणार नसल्याचे मत महाराष्ट्र को- ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले आहे. 

सन २०११ मध्ये केंद्र सरकारने केलेली ९७ वी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. ९७ वी घटनादुरुस्ती रद्द झालेली असली तरी राज्यांनी त्याला अनुसरून केलेले बदल हे वैध राहणार आहेत. कारण या सर्व बदलांना राज्यांच्या विधिमंडळाची मंजुरी आहे. सहकार क्षेत्राबाबत राज्यांचे अधिकार मर्यादित होत नसल्याने या दुरुस्त्या कायम राहतील, असेही अनास्कर यांनी सांगितले.
 

Web Title: vidyadhar anaskar says court ruling does not affect state co operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.