Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या ७ दिवसांत तयार होते ही भाजी, बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत कुठेही रुजवा आणि लाखो कमवा

अवघ्या ७ दिवसांत तयार होते ही भाजी, बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत कुठेही रुजवा आणि लाखो कमवा

Microgreen Farming: घरबसल्या घसघशीत कमाई करण्याचा विचार करत असलात तर तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन आहे. या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम कमाई करू शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 09:57 AM2021-07-24T09:57:54+5:302021-07-24T09:58:56+5:30

Microgreen Farming: घरबसल्या घसघशीत कमाई करण्याचा विचार करत असलात तर तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन आहे. या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम कमाई करू शकाल.

This vegetable is ready in just 7 days, grow Microgreen anywhere from balcony to bedroom and earn millions | अवघ्या ७ दिवसांत तयार होते ही भाजी, बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत कुठेही रुजवा आणि लाखो कमवा

अवघ्या ७ दिवसांत तयार होते ही भाजी, बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत कुठेही रुजवा आणि लाखो कमवा

नवी दिल्ली - घरबसल्या घसघशीत कमाई करण्याचा विचार करत असलात तर तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम कमाई करू शकाल. सध्या सुपर फूड मायक्रोग्रीनला (Microgreen) खूप मागणी आहे. कोरोनाकाळात लोक पोषणावर अधिक लक्ष देत असल्याने याची मागणी अधिकच वाढली आहे. मायक्रोग्रीनमध्ये (Microgreen Farming) फळे आणि भाज्यांच्या तुलनेत ४० पट अधिक पोषकतत्त्वे असतात. त्यामुळे अचानक मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे. या माध्यमातून काही लोक व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.(This vegetable is ready in just 7 days, grow Microgreen anywhere from balcony to bedroom and earn millions)

कुठल्याही झाडाला सुरुवातीला येणाऱ्या पानांना मायक्रोग्रीन म्हणतात. मुळा, मुग, मेथी यासारख्या भाज्यांच्या बियांना सुरुवातीला येणाऱ्या पानांना मायक्रोग्रीन म्हणतात. या सुमारे दोन ते तीन इंच लांब असतात. सुरुवातीला या बियांना पाने आल्यावर त्यांना जमिनीच्या थोड्या वरून कापले जाते. या मायक्रोग्रीन आरोग्यासाठी उपयुक्त असतात. दिवसभरात केवळ ५० ग्रॅम मायक्रोग्रीनचे सेवन केल्यास पोषणामधील सर्व कमतरता भरून निघते.

मायक्रोग्रीनची शेती करणे खूप सोपे आहे. ही शेती कुणीही कुठेही करू शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत कुठेही मायक्रोग्रीन रुजवू शकता. त्यासाठी माती किंवा कोको पीट, जैविक खत किंवा घरात तयार झालेले कंपोष्ट खत, ट्रे आणि बियांची गरज असते. या मायक्रोग्रीनला सूर्यप्रकाशापासून वाचवणे आवश्यक असते. तसेच त्यावर दररोज पाण्याचा छिडकावा करावा लागतो. त्यानंतर काही दिवसांनी यातील भाजी रुजून येते.

मायक्रोग्रीन फार्मिंगच्या सेटअपसाठी फार खर्च येत नाही. त्यामुळे कमी गुंतवणुकीत चांगल्या कमाईसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच तुन्ही दोन ते तीन आठवड्यांमध्ये चांगली कमाई करू शकता. मायक्रोग्रीन फार्मिंगच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी तुम्हाला ही भाजी पंचतारांकित हॉटेल, कॅफे किंवा सुपरमार्केटमध्ये विकू शकता. तिथे तुम्हाला लाखो रुपयांची किंमत मिळेल. तसेच हा व्यवसाय तुम्ही बी टू बी माध्यमातूनही करू शकता. त्यामध्ये तुम्हाला केवळ हॉटेल आणि कॅफेमध्येच मायक्रोग्रीनची सप्लाय करावी लागेल. तसेच तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुकान उघडूनही हा व्यवसाय चालवू शकता.  

Web Title: This vegetable is ready in just 7 days, grow Microgreen anywhere from balcony to bedroom and earn millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.