Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा उच्चांक! भाज्यांचे दर गगनाला भिडले, टोमॅटो 100 रुपये किलो

महागाईचा उच्चांक! भाज्यांचे दर गगनाला भिडले, टोमॅटो 100 रुपये किलो

Vegetable prices : तेल आणि डाळींचे भाव गगनाला भिडत असतानाच आता भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 04:48 PM2021-11-23T16:48:39+5:302021-11-23T16:49:13+5:30

Vegetable prices : तेल आणि डाळींचे भाव गगनाला भिडत असतानाच आता भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Vegetable prices skyrocket, tomato crosses Rs 100 per kilogram | महागाईचा उच्चांक! भाज्यांचे दर गगनाला भिडले, टोमॅटो 100 रुपये किलो

महागाईचा उच्चांक! भाज्यांचे दर गगनाला भिडले, टोमॅटो 100 रुपये किलो

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला आहे. यातच आता भाज्यांच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तेल आणि डाळींचे भाव गगनाला भिडत असतानाच आता भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाज्यांच्या दरवाढीमुळे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.

सध्या अनेक भाज्या सफरचंदांपेक्षा महाग विकल्या जात आहेत. हिवाळ्यात स्वस्तात विकल्या जाणाऱ्या वाटाणा आणि टोमॅटोचे भावही आता शिगेला पोहोचले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये हिवाळ्यात 20/25 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज 100 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर अनेक ठिकाणी 100, 150 आणि 200 रुपये किलोने वाटाणा विकला जात आहे.

ग्राहकांसोबत विक्रेत्यांनाही फटका
भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे फक्त ग्राहकच नाराज नसून भाजी विक्रेत्यांची अवस्थाही बिकट आहे. प्रत्यक्षात भाजीपाल्याचे दर वाढल्यानंतर विक्रीतही घट झाली आहे. राजधानी दिल्लीत भाज्यांचे भाव काय आहेत ते जाणून घेऊया-

भाज्या  किंमत/किलो
वाटाणे : 100 रुपये
टोमॅटो : 80  रुपये
बटाटा : 30  रुपये
भिंडी : 80  रुपये
कांदा : 60  रुपये
लिंबू : 60  रुपये
पालक : 40 रुपये
आले : 100  रुपये
लहसान : 200 रुपये
वांगी : 60  रुपये
कच्ची केळी : 60  रुपये
कच्ची पपई : 60  रुपये
कोबी : 60 रुपये
फुलकोबी : 60 रुपये 
परवळ :  80 रुपये 
छोटी वांगी : 60 रुपये 
भोपळा: 40 रुपये 
देशी काकडी : 60 रुपये 
काकडी : 60 रुपये 
फ्रेंच बीन्स: 160 रुपये 
संकरित काकडी : ६० रु
मशरूम :  60 रुपये 
गाजर : 60 रुपये 
जॅकफ्रूट :  60 रुपये 
स्वीट कॉर्न : 150 रुपये 
ब्रोकोली : 300 रुपये 
शेंगदाणे: 120 रुपये 
मुळा :  60 रुपये 

का महाग होतोय भाजीपाला?
भाजीपाला महाग होण्यामागे अनेक कारणे आहेत. दक्षिण भारतामध्ये टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक खराब झाल्याने दक्षिण भारतामधून येणाऱ्या टोमॅटोची आवक घटली. परिणामी दिल्लीसह देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.

Web Title: Vegetable prices skyrocket, tomato crosses Rs 100 per kilogram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.