lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या ३५ व्या वर्षी १० कोटींची बचत; पैसे वाचवण्यासाठी महिलेचा अनोखा फंडा, वाचून म्हणाल, लय भारी!

अवघ्या ३५ व्या वर्षी १० कोटींची बचत; पैसे वाचवण्यासाठी महिलेचा अनोखा फंडा, वाचून म्हणाल, लय भारी!

२०१८ पर्यंत आम्ही ८,९८,००० पाउंड बचत केली आणि गुंतवणूक केली. मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ च्या दरम्यान गुंतवणुकीतून ४६ हजार पाउंडची कमाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:33 AM2021-09-28T10:33:43+5:302021-09-28T10:35:40+5:30

२०१८ पर्यंत आम्ही ८,९८,००० पाउंड बचत केली आणि गुंतवणूक केली. मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ च्या दरम्यान गुंतवणुकीतून ४६ हजार पाउंडची कमाई केली.

This UK Woman Retired at 35 With Over Rs 10 Cr in Savings. Here's How | अवघ्या ३५ व्या वर्षी १० कोटींची बचत; पैसे वाचवण्यासाठी महिलेचा अनोखा फंडा, वाचून म्हणाल, लय भारी!

अवघ्या ३५ व्या वर्षी १० कोटींची बचत; पैसे वाचवण्यासाठी महिलेचा अनोखा फंडा, वाचून म्हणाल, लय भारी!

Highlightsआम्ही १ मिलियन पाउंडचं टार्गेट पूर्ण केले आणि मी ३५ व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतली. आता केटी डोनेगन आणि पती एलनने नोकरी सोडली आहे. दोघंही वेगवेगळ्या देशांत फिरायला जातात.२०१५ मध्ये मी शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा झाला

कपडे खरेदी न करता, महागड्या हॉटेलमध्ये जेवण न करता १० कोटी रुपये वाचवले जाऊ शकतात. एका महिलेने दावा केलाय की, तिने विनाकारण होणारे खर्च टाळून तब्बल १० कोटी रुपयांची बचत केली आहे आणि वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतली आहे. या महिलेचं नाव केटी डोनेगन असं आहे. मागील २ वर्षापासून केटी तिचा पती एलनसोबत अनेक देशांमध्ये भटकंती करते.

केटी डोनेगनने द सन या वृत्तपत्राशी संवाद साधताना सांगितले की, माझी आई एलिसन टीचर आहे तर पिता क्रिस मार्केटमध्ये रिसर्चर म्हणून काम करतात. आम्ही सर्वसामान्य माणसांप्रमाणेच जीवन जगू शकतो इतकेच पैसे होते. ना हॉलिडेला जात होते आणि कुठल्याही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी पैसे होते. मी नेहमी माझ्या पॉकेट मनीतून पैसे वाचवत होते. मला ते पैसे खर्च न केल्याचा वेगळाच आनंद व्हायचा. सुरुवातीच्या काळात मी ९ पाउंड प्रति तास(१ पाउंड म्हणजे १००.८२ रुपये) या हिशोबाने काम करत होते. त्यानंतर जानेवारी २००५ मध्ये कोस्टा रिका इथं गेली. त्याठिकाणी एलनसोबत माझी भेट झाली. पुन्हा यूकेमध्ये परतली आणि शिक्षण सुरू केले. या काळात विनाकारण खर्च टाळले. नवीन कपडे घेतले नाहीत. कुणाकडून कर्ज घेतले नाही. स्वस्त हॉटेलमध्ये जेवण केले.

२००८ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एलनच्या आईकडे राहायला गेले. ज्यामुळे घरासाठी डिपॉझिट देणं वाचलं. सुरुवातीला मला वर्षाला २८,५०० पाउंडची नोकरी मिळाली. एलन शिकवणी घेत होता. आम्ही फूड पॅकेट खायचो. जुनी गाडी वापरायचो. घरातच पार्टी करायचो. जवळपास २ वर्षात आम्ही ४२ हजार पाउंड बचत केली. ज्यामुळे आम्ही १,६७,६५० पाउंडचे दोन बेडरुम फ्लॅटचं डिपॉझिट दिलं आणि २०१३ मध्ये लग्न केले. लग्नासाठी कम्युनिटी हॉल बुक केला. लोकांना ईमेलद्वारे आमंत्रण केले. सजावट आणि लग्नावर कमी खर्च केले. २०१४ पर्यत मी वर्षाला ५८००० पाउंड कमवत होते. पतीची कमाई ६३००० पाउंड झाली होती. आम्ही महिन्याला ३ हजार पाउंडची बचत करत होतो. २०१५ मध्ये मी शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा झाला. आमच्याकडे २,९१००० पाउंड बचत झाली होती. आमचं टार्गेट १ मिलियन पाउंड होतं.

२०१८ पर्यंत आम्ही ८,९८,००० पाउंड बचत केली आणि गुंतवणूक केली. मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ च्या दरम्यान गुंतवणुकीतून ४६ हजार पाउंडची कमाई केली. आम्ही १ मिलियन पाउंडचं टार्गेट पूर्ण केले आणि मी ३५ व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतली. आमच्या गुंतवणुकीतून आम्हाला प्रत्येक वर्षी ६५ हजार पाउंडची कमाई होते. आता केटी डोनेगन आणि पती एलनने नोकरी सोडली आहे. दोघंही वेगवेगळ्या देशांत फिरायला जातात. परंतु आजही ते विनाकारण होणारा खर्च टाळतात आणि लोकांना पैसे वाचवण्याचा सल्ला देतात.

Web Title: This UK Woman Retired at 35 With Over Rs 10 Cr in Savings. Here's How

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.