Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयात शुल्कामुळे टीव्ही महागणार, ओपन सेल पॅनेलची २५ टक्के दरवाढ

आयात शुल्कामुळे टीव्ही महागणार, ओपन सेल पॅनेलची २५ टक्के दरवाढ

उद्योजक, व्यापारी चिंतित : ओपन सेल पॅनेलची २५ टक्के दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 01:53 AM2020-09-30T01:53:56+5:302020-09-30T01:54:36+5:30

उद्योजक, व्यापारी चिंतित : ओपन सेल पॅनेलची २५ टक्के दरवाढ

TVs will become more expensive due to import duty | आयात शुल्कामुळे टीव्ही महागणार, ओपन सेल पॅनेलची २५ टक्के दरवाढ

आयात शुल्कामुळे टीव्ही महागणार, ओपन सेल पॅनेलची २५ टक्के दरवाढ

अविनाश कोळी ।

सांगली : एलईडी, एलसीडी टीव्हीच्या ओपन सेल पॅनेलला गेली वर्षभर माफ केलेले ५ टक्के आयात शुल्क १ आॅक्टोबरपासून लागू होत असून, पॅनेल उत्पादकांनीही किमती वाढविल्याने टीव्हीला दरवाढीचा शॉक बसणार आहे. शासनाकडून शुल्क सवलतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने १ आॅक्टोबर २०१९ रोजी वर्षाकरिता १५.६ आणि त्यापेक्षा अधिक इंचाच्या एलसीडी, एलईडी टीव्हीच्या ओपन सेल पॅनेलवर असलेले ५ टक्के आयात शुल्क माफ केले होते. ते आता १ आॅक्टोबरपासून पुन्हा लागू होणार आहे. त्यामुळे टीव्हीच्या किमती वाढणार आहेत. ओपन सेल पॅनेलचे उत्पादन केवळ चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांमध्येच होते. टीव्ही पॅनेलमधील ७० ते ८० टक्के उलाढाल चायनीज कंपन्यांकडून होते. त्यामुळे पॅनेलबाबत जगातील उद्योजक चीनवर अवलंबून आहेत. भारतातील टीव्ही उद्योग अधिक सक्षम व्हावा, आत्मनिर्भर व्हावा म्हणून आयात शुल्क माफ केले होते; मात्र आता ते पुन्हा लागू झाले आहे. त्यामुळे दरवाढ होणार आहे. भारतीय टीव्ही उद्योजकांनी ही माफी कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शासनाकडून ही अपेक्षापूर्ती झाली नाही. कोरोनाकाळात या उद्योगासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

टीव्ही उद्योगासमोर इतक्या अडचणी यापूर्वी कधी आल्या नाहीत. भारतीय टीव्ही उद्योजकांना पॅनेलसाठी अन्य देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. दरवाढीमुळे ग्राहक घटण्याचीही भीती असते. त्यामुळे आयात शुल्कात सवलत द्यावी, अशी अपेक्षा आहे.
- घन:श्याम आवटे, उद्योजक

अन्य कारणांमुळेही होणार दरवाढ

च्कोरोनाकाळात देशांतर्गत वाहतूक खर्चात ५० ते ६०
टक्के वाढ झाली आहे.
जहाज वाहतुकीचा खर्च
८ पटीने वाढला आहे.
च्चीन, दक्षिण कोरिया व तैवानमधील ओपन सेल
पॅनेल उत्पादक कंपन्यांनी कोरोनाकाळात २५ ते ३0
टक्के दरवाढ केली आहे.
केंद्र सरकारकडून आता
५ टक्के आयात शुल्क पूर्ववत लागू झाले आहे.

Web Title: TVs will become more expensive due to import duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.