Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टील उद्योगाच्या स्पर्धेत व्यापारी जातात भरडले

स्टील उद्योगाच्या स्पर्धेत व्यापारी जातात भरडले

स्टील इंडस्ट्रीजमध्ये रायपूर आणि जालन्याचे नाव प्रख्यात आहे. दोन्ही ठिकाणच्या इंडस्ट्रीमध्ये दरात कायम चढाओढ सुरू असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:23 AM2020-05-20T03:23:08+5:302020-05-20T03:23:35+5:30

स्टील इंडस्ट्रीजमध्ये रायपूर आणि जालन्याचे नाव प्रख्यात आहे. दोन्ही ठिकाणच्या इंडस्ट्रीमध्ये दरात कायम चढाओढ सुरू असते.

Traders are overwhelmed by the competition of the steel industry | स्टील उद्योगाच्या स्पर्धेत व्यापारी जातात भरडले

स्टील उद्योगाच्या स्पर्धेत व्यापारी जातात भरडले

- संजय खांडेकर

अकोला : रायपूर आणि जालना येथील स्टील उद्योगांच्या व्यावसायिक स्पर्धेत देशभरातील स्टील (लोखंड) व्यापारी भरडले जात असून, त्यांना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागत आहे. रायपूर आणि जालन्याच्या स्टीलच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची तफावत असल्याने व्यापारी भरडले जात आहेत.
स्टील इंडस्ट्रीजमध्ये रायपूर आणि जालन्याचे नाव प्रख्यात आहे. दोन्ही ठिकाणच्या इंडस्ट्रीमध्ये दरात कायम चढाओढ सुरू असते. व्यावसायिक स्पर्धेतून रायपूर इंडस्ट्रीजने गत काही दिवसांपासून चक्क क्विंटलमागे ३०० रु पयांनी दर तोडले. त्यामुळे जालना येथील इंडस्ट्रीच्या चढीच्या स्टीलला उचल नाही. ज्या व्यापाऱ्यांनी चढ्या दराने जालन्याचे स्टील घेतले त्यांचे स्टील कमी दराने मागितले जात आहे.
रायपूरचे स्टील ३८०० रु पये क्विंटल, तर जालन्याचे स्टील ४१०० रु पये क्विंटल दराने विकले जात आहे. वास्तविक पाहता देशभरातील स्टील व्यापाऱ्यांनी ४१०० रु पये क्विंटलपेक्षा जास्तीच्या दराने स्टीलची खरेदी काही दिवसाआधी केलेली आहे. मात्र व्रायपूरने दर कमी केल्याने स्टीलची किंमत घसरली आहे.

Web Title: Traders are overwhelmed by the competition of the steel industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.