Lokmat Money > बिझनेस न्यूज > Billionaires Wealth During Covid-19: कोरोना संकट काळात टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, जाणून घ्या किती लाख कोटींची झाला फायदा! 

Billionaires Wealth During Covid-19: कोरोना संकट काळात टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, जाणून घ्या किती लाख कोटींची झाला फायदा! 

Billionaires Wealth During Covid-19 : रिपोर्टनुसार, जगातील 10 सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत दिवसाला 1.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि या काळात त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:05 PM2022-01-17T12:05:00+5:302022-01-17T12:06:43+5:30

Billionaires Wealth During Covid-19 : रिपोर्टनुसार, जगातील 10 सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत दिवसाला 1.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि या काळात त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

Top-10 Billionaires Wealth Become Double During Covid-19 Pandemic, Total Wealth Of Billionaires Increased By 5 Trillion Dollar | Billionaires Wealth During Covid-19: कोरोना संकट काळात टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, जाणून घ्या किती लाख कोटींची झाला फायदा! 

Billionaires Wealth During Covid-19: कोरोना संकट काळात टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, जाणून घ्या किती लाख कोटींची झाला फायदा! 

नवी दिल्ली : कोरोनाचा काळ हा अर्थव्यवस्थेला धक्का देणारा किंवा लोकांची आर्थिक स्थिती बिघडवणारा म्हटले जात असले तरी, कोट्यधीशांसाठी कोरोना संकट शानदार राहिले. ऑक्सफेमच्या रिपोर्टनुसार,  कोरोना संकट काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत जवळपास 5000 अब्ज डॉसर म्हणजेच सुमारे 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे (how much Billionaires Wealth increased in corona time) दिसून आले. जगातील टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती कोरोनाच्या काळात जवळपास दुप्पट (Top-10 Billionaires Wealth double in covid-19) झाली आहे.

ऑक्सफेमच्या मते, मार्च 2020 मध्ये अब्जाधीशांची एकूण संपत्ती 8.6 ट्रिलियन डॉलर होती, जी नोव्हेंबर 2021 पर्यंत 3.8 ट्रिलियन डॉलर झाली. गेल्या 14 वर्षांच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. रिपोर्टनुसार, जगातील 10 सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत दिवसाला 1.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि या काळात त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

कोरोनाच्या काळात जगातील टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. यामध्ये टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आता जगातील या 10 श्रीमंत लोकांचा समूह जगातील 3.1 अब्ज गरीब लोकांच्या तुलनेत 6 पट मोठा झाला आहे. दरम्यान, प्रत्येक अब्जाधीश आपापल्या स्टाइलमध्ये लोकांना मदत करत असला, तरी त्यांची मदत पुरेशी आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऑक्सफेमचे म्हणणे आहे की, सरकारने या अतिश्रीमंत लोकांवर भारी कर लादला पाहिजे आणि त्यांच्याकडून मिळणारा पैसा लसीकरण आणि आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी वापरला पाहिजे. ऑक्सफेमच्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर (Gabriela Bucher) यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात केंद्रीय बँकांनी हजारो अब्ज डॉलर्स आर्थिक बाजारपेठेत गुंतवले, जेणेकरून अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकेल. त्यामुळे यातील बहुतांश पैसा अब्जाधीशांच्या खिशात गेला.

Web Title: Top-10 Billionaires Wealth Become Double During Covid-19 Pandemic, Total Wealth Of Billionaires Increased By 5 Trillion Dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.