today's latest gold silver price or rate in delhi mumbai | आनंदवार्ता ! तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घट, 10 ग्रॅमसाठी आता मोजा एवढे पैसे
आनंदवार्ता ! तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घट, 10 ग्रॅमसाठी आता मोजा एवढे पैसे

मुंबईः जर आपण या दिवसांत सोने खरेदी करण्याचा विचार करत असल्यास चांगली गोष्ट आहे. तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठ घट झाली आहे. प्रति 10 ग्रॅमसाठी तीन दिवसांत सोन्याच्या दरात 500 रुपयांची कपात नोंदवली गेली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममध्ये 50 रुपयांची घट झाली असून, त्यासाठी आपल्याला 32,670 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचा दर प्रतिकिलो 37,350 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी घटल्यानं आणि रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्यानं सोन्याचे भाव गडगडले आहेत. दोन दिवसांपूर्वीच सोन्याचे भाव 300 रुपयांनी गडगडले असून, प्रति 10 ग्रॅमसाठी 32870 रुपये मोजावे लागत होते. तर मंगळवारी सोन्याचे दर घटून 50 रुपयांनी खाली आले आहेत. आता प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 32,670 रुपये मोजावे लागत आहेत. तीन दिवसांत सोन्यात 500 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोने आणि चांदीचे दर घटले असून, त्यांचा प्रभाव आंतरराष्ट्रीय बाजारावर पडला आहे.

एकीकडे दुष्काळ असला तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यातच आता दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसांपूर्वी 160 रुपयांनी पडला होता, तेव्हा 33,170 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागत होते. अखिल भारतीय सराफा संघ यांच्यामते, औद्योगिक युनिट आणि नाणे उत्पादनात झालेली घट यामुळे चांदीच्या भावात 625 रुपयांचं नुकसान झालं असून, चांदीचं नाणं प्रतिकिलोग्राम 37,625 रुपयांवर आलं आहे.


जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव पडून 1286.50 डॉलर प्रति पौंडवर राहिला आहे. तर चांदीच्या किमतीत झालेल्या घट यामुळे भाव 14.58 डॉलर प्रतिपौंडवर आला आहे. तत्पूर्वी नवी दिल्लीतल्या सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 160-160 रुपयांनी खाली येऊन क्रमशः 33,170 रुपये आणि 33,000 रुपये प्रति 10 ग्राम झालं होतं. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.सोन्यासोबतच चांदीचेही भाव कमी होत आहे. महिनाभरात हे भाव थेट अडीच हजार रुपये प्रतिकिलोने कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.  
 


Web Title: today's latest gold silver price or rate in delhi mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.