lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 1 सप्टेंबरपासून होणार पाच मोठे बदल, जाणून घ्या काय पडणार आपल्यावर प्रभाव

1 सप्टेंबरपासून होणार पाच मोठे बदल, जाणून घ्या काय पडणार आपल्यावर प्रभाव

1 सप्टेंबरपासून देशामध्ये मोठे बदल होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 01:49 PM2019-08-25T13:49:35+5:302019-08-25T13:56:42+5:30

1 सप्टेंबरपासून देशामध्ये मोठे बदल होणार आहे.

things to change from 1st september 2019 | 1 सप्टेंबरपासून होणार पाच मोठे बदल, जाणून घ्या काय पडणार आपल्यावर प्रभाव

1 सप्टेंबरपासून होणार पाच मोठे बदल, जाणून घ्या काय पडणार आपल्यावर प्रभाव

नवी दिल्लीः 1 सप्टेंबरपासून देशामध्ये मोठे बदल होणार आहे. सप्टेंबरमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांशी संबंधित नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे त्याचा भार आपल्या खिशावर पडणार आहे. यातील काही बदल दिलासादायक असले तरी काही बदलांमुळे आपल्या खिशावर ताण पडणार आहे. 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास दुप्पट आणि तिप्पट दंड भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)चं कर्ज स्वस्त होणार आहे. ज्याचा थेट फायदा आपल्याला होणार आहे. 

  • वाहतुकीचे नियम मोडल्यास द्यावा लागणार मोठा दंड

1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे आपल्याला रस्ते वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास जास्त दंड द्यावा लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून मोटर वाहन(संशोधन) अधिनियमात 63 उपनियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दारू पिऊन गाडी चालवणं, ओव्हरस्पीड, ओव्हरलोडिंगचा प्रयत्न झाल्यास दुप्पट दंड द्यावा लागणार आहे. 

  • टॅक्समध्ये होणार हा फायदा
    जुन्या कर चुकवण्यासाठी मोदी सरकार नवी योजना घेऊन आली आहे. या योजनेंतर्गत कर चुकवणं सोपं होणार आहे. ही योजना 1 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून, ती 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या योजनेंतर्गत राहिलेला कर आपल्याला भरता येणार आहे. या योजनेंतर्गत शिल्लक कर चुकवल्यास कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. या योजनेंतर्गत कर चुकवल्यास व्याज, पेनल्टीमधून सूट मिळणार आहे. 50 लाखांच्या करावर 70 टक्के, 50 लाखांहून जास्तीच्या करावर 50 टक्के करातून सूट मिळणार आहे. 
     
  • वाहनाचं नुकसान झाल्यास मिळणार तात्काळ विमा

विमा कंपन्या आता वाहनांचं भूकंप, पूर आणि नैसर्गिक आपत्ती नुकसान, गाड्यांची तोडफोड झाल्यास वेगळ्या प्रकारचं विमा संरक्षण कवच पुरवणार आहेत. 

  • SBIच्या ग्राहकांसाठी RLLRवर मिळणार कर्ज

SBIच्या माध्यमातून घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे. एसबीआयनं गृह कर्जावरच्या व्याजदरात 0.20 टक्के कपात केली आहे. 1 सप्टेंबरपासून वाहन कर्जावरचं व्याजदर 8.05 टक्के होणार आहे. आरबीआयनं ऑगस्टमध्ये रेपो रेट कमी करून 5.40 टक्क्यांवर आणला आहे. 

  • तंबाखू आणि स्वास्थ्यासाठी हानिकारक उत्पादनांना इशारा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं तंबाखूजन्य उत्पादनांवरच्या बंदीसाठी नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन नियम 2008मध्ये बदल करण्यात आला आहे. हे नवी नियम 1 सप्टेंबर 2019पासून लागू होणार आहेत.  

Web Title: things to change from 1st september 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय