lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीपीएफ नियमातील बदलामुळे हे होतील फायदे

पीपीएफ नियमातील बदलामुळे हे होतील फायदे

याशिवाय जीवघेण्या आजाराच्या खर्चासाठी देखील पीपीएफमधील रक्कम काढता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:46 AM2019-12-23T06:46:15+5:302019-12-23T06:46:49+5:30

याशिवाय जीवघेण्या आजाराच्या खर्चासाठी देखील पीपीएफमधील रक्कम काढता येईल.

 These benefits will be due to changes in PPF rules | पीपीएफ नियमातील बदलामुळे हे होतील फायदे

पीपीएफ नियमातील बदलामुळे हे होतील फायदे

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाने पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या (पीपीएफ) नियमांमधे बदल केल्याने मुदतपूर्व खाते बंद करण्याचे विविध पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध झाले आहेत. पीपीएफचा कालावधी हा पंधरा वर्षांचा असतो. मात्र, खाते सुरू केल्यानंतरच्या पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर गुंतवणूकदारांना पैसे काढता येतील.

याशिवाय जीवघेण्या आजाराच्या खर्चासाठी देखील पीपीएफमधील रक्कम काढता येईल. केवळ खातेधारकांच्यासाठीच नव्हे तर पती अथवा पत्नी आणि मुलांच्या आजारपणासाठी देखील पैसे काढता येतील. याशिवाय शिक्षणासाठी पैसे आवश्यक असल्यास त्यासाठीदेखील पैसे काढण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. ही सवलत घेण्यासाठी एक टक्का व्याजावर पाणी सोडावे लागेल. याशिवाय वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय अहवाल सादर करावा लागेल. तर, शैक्षणिक कारणांसाठी पैसे हवे असल्यास देशातील अथवा परदेशातील शिक्षण संस्थेतील प्रवशेची कागदपत्रे द्यावी लागतील.
 

Web Title:  These benefits will be due to changes in PPF rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.