Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA: बिग बास्केटनंतर टाटांच्या भात्यात आणखी एक मोठी कंपनी; 1MG खरेदीच्या तयारीला वेग

TATA: बिग बास्केटनंतर टाटांच्या भात्यात आणखी एक मोठी कंपनी; 1MG खरेदीच्या तयारीला वेग

Tata 1MG deal: काही दिवसांपूर्वी कंपनीने म्हटले होते की, फिटनेस ब्रँड Curefit Healthcare मध्ये कंपनी 550 कोटी रुपये गुंतविणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 04:21 PM2021-06-10T16:21:38+5:302021-06-10T16:27:30+5:30

Tata 1MG deal: काही दिवसांपूर्वी कंपनीने म्हटले होते की, फिटनेस ब्रँड Curefit Healthcare मध्ये कंपनी 550 कोटी रुपये गुंतविणार आहे.

Tata Digital To Acquire Majority Stake in 1MG | TATA: बिग बास्केटनंतर टाटांच्या भात्यात आणखी एक मोठी कंपनी; 1MG खरेदीच्या तयारीला वेग

TATA: बिग बास्केटनंतर टाटांच्या भात्यात आणखी एक मोठी कंपनी; 1MG खरेदीच्या तयारीला वेग

टाटा सन्स (Tata Sons) च्या मालकीची टाटा डिजिटल लिमिटेड (Tata Digital Ltd)ने ऑनलाईन हेल्थकेअर मार्केटप्लेस  1MG Technologies Ltd मध्ये मोठा हिस्सा विकत घेणार आहे. TDL ने गुरुवारी याची माहिती दिली आहे. कंपनीने ही डील कितीला झाली याची माहिती दिलेली नाहीय. (Tata Digital Limited is all set to acquire a majority stake in e-pharma company 1MG Technologies Private Ltd.)


काही दिवसांपूर्वी कंपनीने म्हटले होते की, फिटनेस ब्रँड Curefit Healthcare मध्ये कंपनी 550 कोटी रुपये गुंतविणार आहे. Tata Digital ने सांगितले की, 1एमजीमध्ये गुंतवणूक एक डिजिटल इकोसिस्टीमच्या निर्मितीसाठी Tata Group च्या स्वप्नांना साजेशी आहे. ई-फार्मसी, ई-डायग्नोस्टिक आणि टेली कन्सलटेशन इकोसिस्टीमच्या प्रमुख सेगमेंटमध्ये आहे. यामध्ये वेगाने वाढ होत आहे. 


1 एमजीची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. ही कंपनी देशातील प्रमुख ई-हेल्थ सेक्टर कंपन्यांमध्ये मोडते. ही कंपनी औषधे, आरोग्य आणि अन्य वेलनेस उत्पादनांची घरपोच सेवा आणि टेली कन्सल्टेशन सेवा उपलब्ध करते. Curefit चे संस्थापक सीईओ मुकेश बंसल हे टाटा डिजिटलमध्ये एक एक्झीक्युटीव्हच्या भुमिकेत असणार आहेत.याचबरोबर ते Curefit चे नेतृत्वही करणार आहेत.  टाटा ग्रुपने ऑनलाईन ग्रॉसरी यूनिकॉर्न बिग बास्केट खरेदी केली आहे. गेल्याच महिन्यात ही मोठी डील झाली असून 64 टक्के हिस्सेदारी टाटाने मिळविली आहे. बिग बास्केटमध्ये याआधी चीनच्या अलिबाबा समूह आणि एक्टिस एलएलपीचा मोठा हिस्सा होता. मात्र आता ते यातून बाहेर पडले आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगानं (सीसीआय) गेल्याच महिन्यात या कराराला मंजुरी दिली.

Web Title: Tata Digital To Acquire Majority Stake in 1MG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.