Lokmat Money > बिझनेस न्यूज > झी एंटरटेनमेंटमधील सुभाषचंद्र यांचा मालकी हक्क घटणार; ७000 कोटींचे कर्ज

झी एंटरटेनमेंटमधील सुभाषचंद्र यांचा मालकी हक्क घटणार; ७000 कोटींचे कर्ज

एस्सेल समूहाकडून झी एंटरटेनमेंटमधील १६.६० टक्के भांडवल विकण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 03:05 AM2019-11-22T03:05:57+5:302019-11-22T03:08:55+5:30

एस्सेल समूहाकडून झी एंटरटेनमेंटमधील १६.६० टक्के भांडवल विकण्याचा निर्णय

Subhas Chandra's ownership rights in Zee Entertainment will decline; Loan of Rs | झी एंटरटेनमेंटमधील सुभाषचंद्र यांचा मालकी हक्क घटणार; ७000 कोटींचे कर्ज

झी एंटरटेनमेंटमधील सुभाषचंद्र यांचा मालकी हक्क घटणार; ७000 कोटींचे कर्ज

मुंबई : झी समूहाचे प्रवर्तक असलेल्या एस्सेल समूहाने झी एंटरटेनमेंटमधील १६.६० टक्के भांडवल विकण्याचा निर्णय घेतल्याने झी समूहाचे अध्यक्ष सुभाषचंद्र (गोयल) यांचा मालकी हक्क घटणार आहे.

आर्थिक अडचणीत आलेल्या एस्सेल समूहांकडे विविध बँका व वित्तीय संस्थांचे ७००० कोटी कर्ज थकीत आहे. ते फेडण्यासाठी एस्सेल समूहाने झी एंटरटेनमेंटमधील भांडवल हिस्सा विक्रीस काढला आहे. झी एंटरटेनमेंटची २२.४० टक्के मालकी सुभाषचंद्र यांच्या एस्सेल समूहाकडे आहे. त्यापैकी १६.५० टक्के भांडवल विकले तर सुभाषचंद्र यांच्याकडे फक्त ५.९० टक्के भांडवल हिस्सा शिल्लक राहील व अल्पमतात आल्याने ते झी एंटरटेनमेंटचे अध्यक्ष राहू शकणार नाहीत. बाजारातील सूत्रांनुसार ही विक्री २७७ रुपये प्रति शेअर या दराने होणार असून, त्यातून एस्सेलला ४२०० कोटी मिळण्याची शक्यता आहे. झी एंटरटेनमेंटच्या शेअरचा भाव बुधवारी ३०७ रुपये होता. तेव्हा त्या दराने १६.५० टक्के शेअरचे ५००० कोटी मिळावे, अशी एस्सेल समूहाची अपेक्षा होती.

Web Title: Subhas Chandra's ownership rights in Zee Entertainment will decline; Loan of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.