Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनीती : नवीन आयकर पोर्टल

करनीती : नवीन आयकर पोर्टल

New Income Tax Portal : नवीन आयकर ई-फायलिंग पोर्टलची वैशिष्टे काय असणार आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 07:27 AM2021-06-07T07:27:57+5:302021-06-07T07:28:11+5:30

New Income Tax Portal : नवीन आयकर ई-फायलिंग पोर्टलची वैशिष्टे काय असणार आहेत?

Strategy: New Income Tax Portal | करनीती : नवीन आयकर पोर्टल

करनीती : नवीन आयकर पोर्टल

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आयकर विभाग ७ जून २०२१पासून नवीन ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in सुरू करणार आहे. ई-फायलिंग पोर्टल काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : ई-फायलिंग पोर्टल करदात्याला आयकर रिटर्न भरण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी, अपील करण्यासाठी आणि त्याचप्रकारे तक्रार नोंदविण्यासाठी, रिफंड आणि अशा बऱ्याच कामासाठी वापरता येते. आयकर विभागाकडून या पोर्टलचा वापर नोटीस पाठवण्यासाठी, करदात्याकडून उत्तर मिळवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि असेसमेंट, अपील आणि दंड यांच्या निर्णयासाठी केला जातो.
अर्जुन : नवीन आयकर ई-फायलिंग पोर्टलची वैशिष्टे काय असणार आहेत?
कृष्ण : काही महत्त्वाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे : 
१. नवीन आयकर पोर्टल हे आयकर रिटर्नच्या प्रोसेसिंग पोर्टलने जोडण्यात येईल. जेणेकरून करदात्याला त्वरित कर परतावा मिळेल.
२. सर्व अपलोड केलेली कागदपत्रे,  राहिलेली कामे करदात्याला एकाच डॅश बोर्डवर दिसतील.
३. आयटीआर भरण्यासायाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअर उपलब्ध केले जाईल. करदात्याला आयकराचे ज्ञान नसताना आयकर भरण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून आधीच भरलेला डेटा सॉफ्टवेअरमध्ये असेल, जेणेकरून कमीत कमी डेटा एंट्री करून काम होईल.
४. करदात्याच्या प्रश्नांना त्वरित उत्तर देण्यासाठी  कॉल सेंटर, व्हिडियो, एफअेक्यूज या सुविधा पुरवण्यात येतील.
५. नवीन पोर्टलवर नवीन कर भरणा प्रणाली आणण्यात येणार आहे. ज्यात नवीन पेमेंट पर्याय असतील. 
अर्जुन : नवीन पोर्टल सुरू करण्यासाठी कोणती तयारी केली गेली होती?
कृष्ण : आधीचे पोर्टल www.incometaxindia-efiling.gov.in हे ०१ जून २०२१ ते ६ जून २०२१ दरम्यान उपलब्ध नव्हते. त्याचप्रमाणे अनुपालनाच्या तारखा या १० जून २०२१ नंतर ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून करदात्याला नवीन पध्दत शिकायला वेळ मिळेल.
अर्जुन : नवीन पोर्टलचा काय फायदा होईल?
कृष्णा : करदाता आणि इतर भागधारकांसाठी हा एक नवीन उपक्रम असेल. परंतु  सुरुवातीच्या काळात येणाऱ्या काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

Web Title: Strategy: New Income Tax Portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर