Share Market : भारतीयशेअर बाजारात आज (मंगळवार) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्यामुळे बाजारातील नकारात्मक वातावरण कायम राहिले. बीएसई सेन्सेक्स ४३६.४१ अंकांनी मोठ्या घसरणीसह ८४,६६६.२८ अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्सही १२०.९० अंकांनी घसरून २५,८३९.६५ अंकांवर स्थिरावला. सोमवारीही बाजारात मोठी घसरण झाली होती. काल सेन्सेक्स ६०९.६८ अंकांनी, तर निफ्टी २२५.९० अंकांनी तुटला होता.
घसरणीचे मुख्य कारण
बाजार तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार १० डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांची घोषणा होण्यापूर्वी अत्यंत सावधगिरीने व्यवहार करत आहेत. यामुळे विक्रीचा दबाव कायम आहे.
सेन्सेक्स-निफ्टीतील सर्वाधिक नुकसान
मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ८ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर बंद झाले, तर उर्वरित २२ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणीवर बंद झाले. निफ्टी ५० मधीलही केवळ १७ कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर ३३ कंपन्यांना नुकसान झाले. सेंसेक्सच्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६१% ची मोठी घसरण नोंदवली गेली. तर एटरनलचे शेअर्स २.३०% वाढीसह बंद झाले.
तेजीमध्ये असलेले शेअर्स
- टायटन : २.१२%
- अदानी पोर्ट्स : १.०७%
- बीईएल : ०.८२%
- भारतीय स्टेट बँक : ०.४०%
मोठी घसरण झालेले शेअर्स
- टेक महिंद्रा : १.९९%
- एचसीएल टेक : १.७८%
- टाटा स्टील : १.७४%
- मारुती सुझुकी : १.१६%
- सन फार्मा : १.०५%
- आयसीआयसीआय बँक : १.०४%
वाचा - 'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही ०.५% ते ०.९% पर्यंत घट झाली.
