Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत

कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत

Mini Diamonds India Ltd share: या कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली. कंपनीच्या शेअरला आज २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:50 IST2025-12-02T15:50:33+5:302025-12-02T15:50:33+5:30

Mini Diamonds India Ltd share: या कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली. कंपनीच्या शेअरला आज २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

Mini Diamonds India Ltd share Investors jump on debt free company shares 20 percent upper circuit price hits rs 33 | कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत

कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत

Mini Diamonds India Ltd share: पेनी स्टॉक कंपनी मिनी डायमंड्स (इंडिया) लिमिटेडच्या (MDIL) शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली. कंपनीच्या शेअरला आज २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. यामुळे हा शेअर ३३.३५ रुपये या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला होता. या शेअरचा मागील बंद भाव ₹२७.८० होता. मंगळवारी कंपनीचं बाजार भांडवल (Market Cap) देखील ₹३९३ कोटींच्या वर राहिलं. या तेजीमागे एक मोठं कारण आहे. कंपनीला हाँगकाँगच्या एका क्लायंटकडून ₹१३.५ कोटींची नवीन एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली आहे.

ऑर्डरचा तपशील

ही ऑर्डर खास पद्धतीनं डिझाइन केलेले, इन-हाउस विकसित केलेले स्पेशल कट लॅब-ग्रोउन पॉलिश डायमंड्ससाठी आहे. कंपनी याच ग्राहकाच्या जुन्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करत आहे, ज्यामुळे बाजारात कंपनीवर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढलाय.

कंपनीचे चेअरमन आणि एमडी उपेंद्र एन. शाह यांनी सांगितलं की, ही पुन्हा मिळालेली ऑर्डर त्यांच्या गुणवत्ता, विश्वासार्हता आणि संशोधन व विकास (R&D) क्षमतेचे प्रदर्शन करते. ते म्हणाले की, राउंड कट डायमंड्स व्यतिरिक्त युनिक शेप्स उपलब्ध करून कंपनी आंतरराष्ट्रीय ग्राहकांना अधिक डिझाइन पर्याय देऊ इच्छिते. यामुळे केवळ कंपनीचे निर्यात बाजारातील केवळ अस्तित्व मजबूत होणार नाही, तर आगामी काळात लॅब-ग्रोउन डायमंड्सची मागणी देखील वाढण्याची अपेक्षा आहे. आजच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खास डिझाइन असलेल्या डायमंड्सची मागणी वेगाने वाढत आहे आणि MDIL याच गरजेवर लक्ष केंद्रित करत आहे.

उत्पन्नात वाढ, कर्ज कमी

आर्थिक आघाडीवरही कंपनी उत्कृष्ट कामगिरी करत आहे. जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत कंपनीचा महसूल ₹१००.५८ कोटींवरून वाढून ₹१४९.४६ कोटी झाला आहे, म्हणजे सुमारे ४८.५% ची वाढ झाली आहे. नफा देखील ₹१.७८ कोटींवरून वाढून ₹२.६२ कोटी वर पोहोचला आहे.

कंपनीची ROCE (Return on Capital Employed) १५.८% आणि ROE (Return on Equity) १२.२% आहे, जे मजबूत आर्थिक स्थिती दर्शवते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. तिचे डेट-टू-इक्विटी प्रमाण केवळ ०.०४ आहे. तसेच, कंपनीने आपल्या कामकाजातही सुधारणा केली आहे; डेब्टर डेज १७८ वरून १३९ झाले आहेत, म्हणजे आता कंपनी वेगानं पैसे वसूल करत आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : कर्जमुक्त मिनी डायमंड्स हांगकांग एक्सपोर्ट ऑर्डर पर 20% ऊपर

Web Summary : मिनी डायमंड्स इंडिया लिमिटेड को ₹13.5 करोड़ का हांगकांग एक्सपोर्ट ऑर्डर मिलने के बाद शेयर में 20% की वृद्धि। मजबूत वित्तीय प्रदर्शन और लगभग कर्जमुक्त होने से निवेशकों का विश्वास बढ़ा। आरओसीई 15.8% और आरओई 12.2% है।

Web Title : Debt-free Mini Diamonds Soars 20% on Hong Kong Export Order

Web Summary : Mini Diamonds India Ltd. hits upper circuit after securing ₹13.5 crore Hong Kong export order for specialized lab-grown diamonds. Strong financial performance, including increased revenue and near debt-free status, boosts investor confidence. ROCE is 15.8% and ROE is 12.2%.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.