SSMD Agrotech India IPO : एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी बाजारात कोसळले आहेत. एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाचे शेअर्स सुमारे ४० टक्के घसरणीसह ७३ रुपयांवर बाजारात लिस्ट झाले. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरचा किंमत बँड १२१ रुपये होता.
एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाचा आयपीओ बोली लावण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडला होता आणि तो २७ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीच्या पब्लिक इश्यूचा एकूण आकार ३४.०९ कोटी रुपयांपर्यंत होता.
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये रिकव्हरी
खराब लिस्टिंगनंतर एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह ७६.६५ रुपयांवर पोहोचलेत. इशू मुंजाल, सुरभी मुंजाल आणि जय गोपाल मुंजाल हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. आयपीओ पूर्वी कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा १०० टक्के होता. मंगळवारी एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाचे मार्केट कॅप ६६ कोटी रुपयांच्या वर पोहोचलंय.
कंपनीचा IPO १.६२ पट सबस्क्राइब झाला
एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाचा आयपीओ (SSMD Agrotech India IPO) एकूण १.६२ पट सबस्क्राइब झाला होता.
कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या कॅटेगरीत २.५४ पट सबस्क्रिप्शन मिळालं.
तर, गैर-संस्थागत गुंतवणूकदारांच्या कॅटेगरीत ०.६२ पट बोली लागली.
क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स कॅटेगरीत ५.३३ पट सबस्क्रिप्शन मिळालं.
एसएसएमडी ॲग्रोटेक इंडियाच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लॉटसाठी बोली लावू शकत होते. आयपीओच्या २ लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच, सामान्य गुंतवणूकदारांना २ लॉटसाठी २,४२,००० रुपये गुंतवावे लागले.
कंपनी काय करते?
एसएसएमडी ॲग्रोटेक इंडिया उच्च गुणवत्तेच्या ॲग्रो-फूड उत्पादनांच्या निर्मिती, व्यापार आणि रिपॅकेजिंग व्यवसायात आहे. ही कंपनी मनोहर ॲग्रो, सुपर एस.एस, दिल्ली स्पेशल आणि श्री धनलक्ष्मी या चार ब्रँड्स अंतर्गत आपलं कामकाज चालवते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये पफ्ड राईस, बेसन, चणा डाळ, इडली रवा, राईस पावडर यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
